पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे गृहमंत्र्यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी ) शेतकऱ्यांसाठी गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवण्यात यावे, अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन केली. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेऊन धरण प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली या वेळी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, सुनिल पाटील, एस. एन. पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, देविदास देसले, अॅड कुंदन साळुंखे यांनी निवेदन दिले. या वेळी डॉ.अशोक पाटील, अजयसिंग पाटील, वसुंधरा लांडगे, अॅड तिलोत्तमा पाटील, हेमंत भांडारकर, डी. एम. पाटील, महेश पाटिल, सुपडू बैसाणे, एन. के. पाटील, योगेश पाटील, सुनिल पवार, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, गोकुळ बागुल, सुशिल भोईटे, व्ही. ए. पाटील, भास्कर बोरसे, रहेमतूल्लाह पिंजारी, रमेश पाटील, संजय पाटील, हिम्मतराव पाटील, किशोर पाटील उपस्थित होते.