अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कामी होऊ लागला आहे. रविवारी आलेल्या अहवालातही एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. काही दिवासत ही संख्या शून्यावर येण्याची अपेक्षा आहे. यामुळे दिलासा मिळला आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३६ झाली आहे.
अमळनेर शहरातसह तालुक्यात रविवारी आलेल्या अहवालात अमळनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४३१५ रुग्ण कोरोनावर मात करून सुखरूप घरी गेले आहे. कोविड रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर तालुक्यात आतापर्यंत १०३ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.