कोणताही फैलाव होण्याआधीच डेंग्यूला आवरा, प्रांताधिकाऱ्यांच्या आरोग्य विभागाला आदेश

अमळनेर (प्रतिनिधी)एकीकडे कोरोना कमी होत असताना दुसरीकडे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. यामुळे संभाव्य साथीचा धोका लक्षात घेऊन वेळीच डेंग्यूला आवर घाला, असे आदेश  प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाच्या भीतीच्या सावटातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत अमळनेर तालुक्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळल्याने जनतेत डेंग्यूची भीती निर्माण झाली आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी आपल्या दालनात बैठक बोलावून आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. बैठकीस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी ,किशोर माळी, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन , डॉ. राजेंद्र शेलकर उपस्थित होते.

शहरात आशा करा उपाययोजना

ठिकठिकाणी फवारणी , धुरळणी करावी , नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करावे , कंटेनर तपासणी करावी , जेथून पाण्याचा निचरा करता येणे शक्य नाही अशा  डबक्यांमध्ये , नाल्यांमध्ये ऑइल , औषध टाकून डेंग्यूच्या डासांचा नायनाट करावा , नियमित साफसफाई करण्यात यावी आणि नागरिकांत जनजागृती करावी असे आदेश प्रांताधिकारी अहिरे यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *