अमळनेर(प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्यांच्या आश्वासन पूर्ततेसाठी एसटी कामगार शुक्रवारी एक दिवसाचे मौनव्रत धारण करणार आहेत.
“सव्वा लाख एस.टि.कर्मचाऱ्यांचे दायित्व असणाऱ्या एस.टी. तील मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या आवाहनुसार आश्वासनाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राज्यातील एसटी संघर्ष ग्रुपचे सदस्य या मौनव्रतमध्ये सहभागी होणार आहेत. एस.टि. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न,करार,वेतन,बोनस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील,शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते तसेच अधिवेशनात खा.शरदचंद्र पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होण्यासाठी आक्रमक होण्यासाठी हे एक दिवसाचे मौनव्रत आंदोलन केले जात आहे.