अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील गुरुवारी आलेल्या अहवालात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३० वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यात दोन्ही रुग्ण नवे असून यात अमळनेर शहरात १ रुग्ण आणि ग्रामीण भागातील १ रुग्णांचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकही रुग्णांचा समावेश नाही. तर खासगी रुग्णालयातील एकाही रुग्णांचा समावेश नाही. तसेच गुरुवारी ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या कोविड रुग्णालयात २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.