सुरुवातीपासूनच अमळनेर शहरात कोरोनाने सर्वांनाच केले होते “डरोना”
अमळनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात सुरुवातीपासूनच अमळनेर शहरात कोरोनाने सर्वांनाच “डरोना” करून सोडले होते. रोज वाढणार्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने प्रत्येकाला धडकी भरत होती. तरीही प्रत्येक जण लढा देत होते. आजही देत आहेत. त्यात शुक्रवारी अखेर रुग्ण नसल्यामुळे प्रताप कॉलेजमधील कोवीड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आल्याने आजचा दिवस अमळनेरकरांसाठी आनंदोत्सवात साजरा करणारा ठरला…
अमळनेर तालुक्यात मुंगसे येथे पहिली महिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर साळी वाड्यातून विस्फोट झाला. नंतर मात्र रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने २७ एप्रिल रोजी प्रताप कॉलेज येथे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. डॉक्टर ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरू झाले. या काळात येथे एकूण १६३१ पॉझिटिव पेशंट रिचार्ज करण्यात आले. एकूण १७३५ आरटीपीसीआर ( RTPCR) स्वॅब घेण्यात आले. एकूण ४२२८ रॅपिड एंटीजन टेस्टिंग झाल्यात, त्यात ८५० लोक पॉझिटिव आलेत.
अंमळनेर कोवीड केअर सेंटर हे अशा प्रकारचे जळगाव जिल्ह्यातले पहिले सेंटर होते. ज्या वेळेला अत्यंत कमी माहिती या आजाराविषयी होती. त्याकाळात अल्प वेळेमध्ये असे सेंटर सुरू करून अमळनेर प्रशासनाने आणि स्वास्थ्य विभागाने अत्यंत जबाबदारीने आपली कर्तबगारी दाखवून दिली. प्रांत सीमा अहिरे,तहसिलदार मिलिंद वाघ, डॉ. प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, डॉ. गिरीश गोसावी,डॉ. संदीप जोशी ,डॉ. राजेंद्र शेलकर, डॉ. विलास महाजन, प्रशासनातले असंख्य अधिकारी व कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, स्वाब घेण्यासाठी वालंटियर, अमळनेरचे सर्व पक्षाचे पुढारी, पत्रकार व अनेक सोशल वर्कर्स यांनी या सर्व मोहिमेला सहकार्य केले. त्याचेच फलित आहे की आज कोविंड केअर सेंटर पेशंट नसल्यामुळे तात्पुरते का होईना बंद केेले आहे.
आठ नऊ महिन्यांमध्ये केलेल्या सर्व मेहनतीचे आज झाले फलित
भविष्यात जर दुसरी लाट आलीच तर सर्वजण तत्परतेने अमळनेरच्या सेवेसाठी त्वरित उपलब्ध असतीलच, परंतु सर्व जनतेने आपले कर्तव्य मात्र चोख पार पडले पाहिजे. कोरोना पूर्णपणे गेला असं न समजता भविष्यात तो पुन्हा येणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
गेल्या आठ नऊ महिन्यांमध्ये केलेल्या सर्व मेहनतीचे आज फलित झाल्यासारखे वाटत आहे.