प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन शासकीय विभागांचा घेतला आढावा
अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागाचे उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांनी अमळनेर तालुक्यातील रोजगार हमींच्या कामांची पाहणी केली. तसेच ग्रामसेवकांनी १ ते ६ नमुने दप्तरी ठेवावेत ,दप्तर अपडेट ठेवावे , घरकुलांचे काम त्वरित पूर्ण करावे, चुकीचे कामे करू नका, असे आदेशही विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले.
नाशिक विभागाचे उपायुक्त डॉ अर्जुन चिखले यांनी अमळनेर तालुक्यातील कामांची पाहणी केली. यात त्यांनी रणाईचे येथील फळबागा ,जवखेडा येथील बिहार पॅटर्न वृक्ष लागवड आणि शिरूड येथील वॉल कंपाऊंड आणि गोठा शेडची पाहणी केली. त्यांनतर प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात महसूल , पंचायत समिती, कृषी, आरोग्य, वन, सामाजिक वनीकरण विभागांचा आढावा घेतला. पंचायत समितीचा आढावा घेताना १७ पासून घरकुले अपूर्ण आहेत ती पूर्ण करा, मागच्या वर्षाच्या कामाला यावर्षी परवानगी देऊ नका , घरकुले ,विहिरी , शौचालये आदी कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना पेमेंट अदा करा आशा सूचना दिल्यात. महसूल विभागाचा आढावा घेताना डॉ. चिखले म्हणाले की रेशन कार्ड नसलेल्या आदिवासींना रेशन कार्ड द्या , बोगस कार्ड कोणालाही देऊ नका आणि लाभार्थ्यांना वेळेवर लाभ द्या तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींशी सल्ला मसलत करून आराखडे तयार करा, ३१ ऑक्टोबरपर्यंत आराखड्यांचे काम पूर्ण करा असे आदेश दिले.
कोरोना संसर्गवर आरोग्य विभागाच्या कामावर व्यक्त केले समाधान
आरोग्य विभागाचा आढावा घेतला असता व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नाही आणि ऑक्सिजन वर फक्त एकच रुग्ण असल्याचे संगीतल्यानन्तर चिखले यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सारी व आयलायच्या रुग्णांबाबत तपासणी व आकडेवारी घेण्यात आली. ३७ पथकांमार्फत ८८९७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आयलाय व सारीच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येऊन पॉझिटिव्ह रुगणांचे प्रमाण कमी आढळून आले.
आढावा बैठकीत हे अधिकारी होते उपस्थित
या आढावा बैठकीस प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसिलदार मिलिंद वाघ ,गटविकास अधिकारी संदीप वायाळ ,मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , तालुका कृषी अधिकारी भारत वारे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रकाश ताडे , नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन , संजय चौधरी , वनाधिकारी , लिपिक ठाकरे ,धमके उपस्थित होते.