खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वादळी पावसामुळे निंभोरा येथील केळी उत्पादक शेतकरी झाले उद्ध्वस्त

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी झाले चिंतातूर

अमळनेर (प्रतिनिधी) रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे केळी उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
अमळनेर तालुक्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. निंभोरा येथील रतिलाल धनगर कोळी यांनी शेतात सहा हजार केळीचे रोपांची लागवड केली होती, केळीचे घड तयार झाल्याने काही दिवसात रतिलाल यांना दोन पैसे मिळणार होते मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे सहा हजार पैकी १५०० केळीचे झाडे घडसाहित उन्म्न्ळून पडले आहेत, त्यामुळे रतिलाल यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर आलेश प्रल्हाद धनगर यांच्या शेतातील सुमारे ५०० झाड खाली पडले आहेत, हात उसनवारी करून शेतात केळी ची लागवड केली, मात्र दोन पैसे हाती येण्या अगोदरच वादळी पावसाने सर्वच हिरावून नेले.

तलाठी यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना

अमळनेर तालुक्यातील संबंधित तलाठी यांना प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सांगून वरिष्ठ पातळीवर योग्य त्या कार्यवाहीसाठी अहवाल पाठवण्यात येईल.
मिलिंद वाघ , तहसीलदार अमळनेर 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button