खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जळगाव येथील बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी वीजशी संबंधित नवीन प्रस्ताव, प्रलंबित कामे केली साद

तातडीने कार्यवाही करुन आमदारांना अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या नवीन व प्रलंबित कामांचा घेतला आढावा

अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव येथे सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीज वितरणच्या बैठकीत अमळनेर मतदार संघातील वीज वितरणाशी संबंधित नवीन कामांचे प्रस्ताव, प्रलंबित कामे आमदार अनिल पाटील यांनी मांडली. त्यावर तातडीने कार्यवाही करुन आमदारांना अहवाल सादर करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात.
जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या नवीन व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  झाली, यावेळी आमदार अनिल पाटील यांच्यासह आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिक्षक अभियंता शेख, मानकर यांच्यासह वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार अनिल पाटलांनी सादर केलेली मतदार संघातील विविध कामे

अमळनेर मतदारसंघासाठी आमदार अनिल पाटील यांनी विविध नवीन प्रस्ताव व कामे या बैठकीत सादर केली. यात नवीन व जुन्या ३३ के व्ही वाहिन्या २२० केव्ही उपकेंद्रातून जोडण्याबाबत नवीन आयपीडीएस ३३ के व्ही उपकेंद्र,३३ के व्ही पातोंडा लाईन स्थलांतरित करणे, ३३ के व्ही सारबेटे नवीन लाईन, ३३ के व्ही गांधली, ३३ के व्ही सारबेटे उपकेंद्र, ३३ के व्ही एमआयडीसी, मारवड, शेळावे, अमळनेर शहर, वावडे, कळमसरे व इतर केंद्र बाबत समस्या मांडल्या. तसेच पॉवर ट्रान्सफार्मार क्षमता वाढ, शेतीपम्प, वाहिन्या भूमिगत करणे, सिंगल फेज वाहिन्या थ्रीफेज करणे, ग्रामिण भागातील जीर्ण खांब बद्दलविणे, नादुरुस्त रोहित्र बद्दलविणे, ग्रामिण भागात अतिरिक्त पथदिवे व फेज वायर मंजूर करणे, जीर्ण उपकेंद्राच्या इमारती दुरुस्त करणे आदी कामे सादर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button