ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आमदार पाटील यांनी दिले आश्वासन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या तालुका पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथील नागरिक पिढ्या न पिढ्यापासून अनेक समस्यांचा सामना करीत आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमदार आनिल पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. त्यांच्या मागण्या ऐकून घेत आमदार पाटील यांनीही त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी खेडीढोक येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने चिखलोड ते खेडीढोक रस्ता, खेडीढोक ते राजवड रस्ता तसेच अमळनेरहून गावात येतांना नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याच्या मागणीचे निवेदन प्रतिनिधिक स्वरूपात दिले. या वेळी ज्येष्ठ नागरिक युवराज पाटील, तुकाराम मैराळे, नरसिंग पाटील, नारायण पाटील, माजी सरपंच सुमेरसिंग पाटील, बाळू पाटील, मनोज पाटील, पवन पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील, संग्रामसिंग पाटील, विक्की पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.