धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयातर्फे झाली स्पर्धा
अमळनेर(प्रतिनिधी) धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयातर्फे झालेल्या ‘महात्मा गांधींचे आरोग्य व स्वच्छतेबाबत विचार ’या विषयावरील उत्तर महाराष्ट्र स्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत धुळे विधी महाविद्यालयचा अंतिम वर्षीय विद्यार्थी सारांश सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत गत वर्षाचे विजेते सारांश धनंजय सोनार याने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ‘महात्मा गांधींचे आरोग्य व स्वच्छतेबाबत विचार ’या विषयावर आपले विचार मांडले. डॉ. आशुतोष पाटील यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. त्याचे प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्या ज्योती राणे, वैभव सबनीस, डीगंबर महाले, डॉ. जी. एम. पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. रमेश माने, प्रा.संदेश शेगावकर, प्रा.डी.बी.पाटील, सतीश (प्रदीप) देशमुख, प्रा. लीलाधर पाटील, प्रा. पराग पाटील, संजय कृष्णा पाटील, चंदू काटे, शाम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित वीसपुते, रवींद्र विसपुते, गणेश खरोटे, पत्रकार संजय सोनार, अमळनेर पत्रकार संघ व सुवर्णकार समाज यांनी कौतुक केले आहे.