???? महात्मा गांधी ची 151 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ????
????पूर्ण नाव : मोहनदास करमचंद गांधी.
???? आईचे नाव : पुतळाबाई
????पत्नीचे नाव : कस्तुरबा गाधी
✔️ जन्म : 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर (गुजरात)
✔️ निधन : 30 जानेवारी 1948, दिल्ली.
???? २ ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
???? मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून गांधीजी १८९१ मध्ये भारतात परतले.
???? भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली करू लागले.
???? महात्मा गांधीजींवर प्रभाव टाकणारे ग्रंथ :
???? Unto This Last : जॉन रस्कीन,
???? Leaves of Grass : वॉल्ट हिटमन, ???? Waldel : हेरन्री डेव्हिड थोर
————————————————————–
???? Part 1 ????
???? आज महात्मा गांधीजींच्या 151 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
◾️नाव : मोहनदास करमचंद गांधी
◾️जन्म : 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर (गुजरात)
???? 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो
◾️प्रभाव: लिओ टॉलस्टॉय, जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले यांचा
????महात्मा गांधीजींवर प्रभाव टाकणारे ग्रंथ :
???? Unto This Last : जॉन रस्कीन,
???? Leaves of Grass : वॉल्ट हिटमन, ???? Waldel : हेरन्री डेव्हिड थोर
◾️1891 साली इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून भारतात परतले
◾️ भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली सुरु केली
◾️1893 साली दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला व आफ्रिकेला गेले
◾️त्यांना पीटरमारित्झबर्ग शहरात रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले व तेथेच कृष्णवर्णीय म्हणून अपमान झाला
◾️त्यांनी 1894 मध्ये नाताळ भारतीय कॉंग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना एका राजकीय पक्षात परावर्तित केले
◾️सत्याग्रहाचा उपयोग 1915 साली गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला
◾️1915 साली गांधी भारतात कायमचे आले दरम्यान गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते
????गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून गोखले यांना ओळखले जातात
◾️गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला
◾️ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी 1930 साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली
◾️गांधीजीना पहिले मोठे यश 1917 मध्ये चंपारण येथे मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत व योग्य मोबदला देत नसत
◾️1918 खेडामधील शेतसारा सत्याग्रहातही यश मिळाले
◾️खेडा आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ म्हणून करू लागले
???? इंग्रजांशी वाटाघाटी सरदार पटेल यांनी केल्या दरम्यान कर रद्द केला
◾️ 1918 साली अहमदाबाद येथे गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी गांधींनी प्रथम उपोषण केले व प्लेग बोनस आणि वाढीव पगार देण्यात आला.
◾️एप्रिल 1919 सालच्या पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात संतापाची लाट उसळली
◾️1919 सालच्या खिलाफत चळवळीचे नेतृत्व गांधींनी केले
◾️1919 सालीच ब्रिटिशांना सहकार्य न करण्यासाठी देशभर असहकार चळवळ उभारली
◾️1922 साली चौरीचौरा येथील आंदोलकांनी 22 पोलिसांना जिवंत जाळल्याने असहकार चळवळ मागे घेतले
◾️असहकार चळवळ मागे घेतल्याने क्रांतिकारकांनी गांधीजींची साथ सोडली व HRA, HSRA सारख्या संघटना सुरु केल्या
◾️गांधी अटकेत असताना काँग्रेसमध्ये फूट पडून मोतीलाल नेहरू व CR दास यांनी 1923 साली “स्वराज्य पक्षाची” स्थापना केली तर दुसरा गट पटेल यांचा होता.
◾️ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
◾️या समितीमध्ये एकपण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला.
????युनियनिस्ट पार्टी, जस्टीस पार्टी व आंबेडकर समर्थक होते
◾️ गांधीजींनी 1928 च्या कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला
◾️भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले
◾️गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला(1929 पर्यंत)
◾️ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि 31 डिसेंबर इ.स. 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला.
???? हा दिवस कॉंग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला
◾️गांधींनी सविनय कायदेभंग सुरु केले त्यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह इ समावेश होता
◾️गांधीजींनी मग मार्च 1930 मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. 12 मार्चला अहमदाबाद साबरमतीतुन निघालेली यात्रा 6 एप्रिलला दांडीला पोहोचली
◾️दरम्यान सायमन कमिशनने आपले काम आटोपून मे 1930 मध्ये अहवाल सादर केला व गोलमेज परिषदेची शिफारस केली
◾️शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. 5 मार्च 1931 मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली
◾️इंग्लंड येथे 3 गोलमेज परिषदांचे आयोजन केले मात्र गांधीजी नाराज होते, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता
: ???? Part 2 ????
◾️गांधींच्या मते भारताबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार फक्त काँग्रेसलाच आहे म्हणून गांधी दुसऱ्या परिषदेतून परत आहे व पुन्हा आंदोलन 1934 पर्यंत सुरु ठेवले
◾️दरम्यान इंग्लंडलचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनॉल्ड यांनी ऑगस्ट 1932 साली जातीय निवडा घोषित केला त्यात दलितांना स्वतंत्र मतदारसंघ होता
◾️यावेळी गांधी येरवडा तुरुंगात होते, दलितांच्या मतदारसंघाला विरोध म्हणून 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरु केले,
????4 दिवसांनी आंबेडकर यांनी गांधींना जीवदान म्हणून आपली मागणी मागे घेतली व 24 सप्टेंबर 1932 रोजी “पुणे करार”, येरवडा करार, “Poona Pact” राखीव जागांवर झाला
◾️गांधींनी दलितांसाठी 1932 साली अस्पुश्यता निवारण संघ सुरु केला त्याचे पहिले अध्यक्ष मदन मोहन मालवीय होते
◾️1934 साली गांधींनी काँग्रेसचा राजीनामा दिला तर पुन्हा 1936 साली प्रवेश केला
◾️1942 साली मुंबईच्या आझाद मैदानावरून छोडो भारत / चले जाव चळवळ सुरु केली
◾️1947 साली भारताची फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळत असताना गांधीजी बंगालमध्ये नौखाली येथे हिंदू – मुस्लिम दंगे शांत करण्यात व्यस्त होते.
◾️त्यांची हत्या दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गोळी मारून करण्यात आली
◾️मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते
????गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना 15 नोव्हेंबर 1949 ला फाशी देण्यात आली.
????हत्येचे कारण, त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते
◾️हत्या : 30 जानेवारी 1948, दिल्ली
प्रमुख स्मारक : राजघाट
: तो महात्मा मला आई वाटतो…!!!
ज्यांची गांधीजींच्या पायपोसा जवळही
बसायची योग्यता नाही
त्यांनी खुशाल शिव्या द्याव्यात त्यांना,
तोंडाची गटार, गटारीच तोंड करून घाण ओकावी
यथेच्छ चिखल फेक करावी वा लाखोली वहावी
किंवा कमरेच काढून डोक्यावर लेवून टीका करावी
याची फिकीर गांधींना मरणा आधीही नव्हती आत्ताही नाही…!
ज्यांना कुठल्याच जातीन तूरूंगात डांबल नाही
आमचे नेते म्हणून साखळदंडांनी बांधल नाही
जगातील सर्व किनाय्रांना स्पर्श करण्यासाठी
ते मुक्त आहेत महासागरा सारखे
त्यांना देशाची, धर्माची, वंशाची बंधन नाहीत…!
त्यांच ह्रदय विशाल आहे आई सारख,
अपराध पोटात घालणार…!
हाडा मासाचा तो किरकोळ देह…
प्रेम वाटणारा आणि प्रेम मागणारा
जगातील सर्वात श्रीमंत अर्धनग्न फकिर…!
ते वात्सल्य प्रवाहीत करणारे त्यांचे डोळे
ते निरागस निष्कपट आईसारख हास्य…
हे सार सार मला लहान मुला सारख आकर्षीत करत…!
ऊघड्या देहाचा तो वृध्द मनूष्य…
काटी टेकवत एकला चलो रे म्हणणारा
हजारोंच्या हिंसक दंगलीत अहिंसेची फुल फुलवणारा…
मुठभर मीठ उचलून ब्रिटीश महासागराला आव्हान करणारा…
मानवतेवर प्रेम करा म्हणत भंगी वस्ती झाडणारा…
तो महात्मा मला आई वाटतो…!
मानवतेवर निस्सीम प्रेम करणाय्रा, माऊली स्वरूप महात्मा गांधीजींना काळजापासुन कोटी कोटी प्रणाम…__/\__
#गांधी_जयंती_जागतीक_अहिंसा_दिनी
‛अहिंसा’ आणि ‛ सत्याग्रह ’…
पॅसिव्ह रेझिस्टन्स (निःशस्त्र प्रतिकार.)
“ दे दी हमें आज़ादी बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल.”
हे बोल अगदी सार्थ आहेत,कमी पडतो ते आपणचं
आणि ते नाकारण्याचे काहीच कारण नाही. प्रश्न आहे तो इतिहास गांधीजीं संबंधी कोणता निर्णय घेतो.? गांधीजींची स्वातंत्र्याची संकल्पना काही संकुचित संकल्पना नाही.तिच्यात माणसाच्या संपूर्ण प्रतिष्ठेसह त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा समावेश आहे.स्वातंत्र म्हणजे, हे फक्त परकीय राज्य कर्त्यांकडून मिळवणे नव्हे,तर त्यांना स्वराज अपेक्षित होते.गांधीजींना हवे असणारे स्वातंत्र आधी आपण लक्षात घेतले पाहिजे.जिथे दारिद्र नसेल,गरिब-श्रीमंत भेद-भाव नसेल,अस्पृश्यतेच्या अभिशापाला वा मादक द्रव्यांना कोणतेही स्थान नसेल, सर्व समुदायांमध्ये मैत्रीभाव असेल, स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार असतील,शिक्षण,समाज व्यवस्था, शारीरिक श्रमाला योग्य मोबदला, दुर्बल घटक अशा एक ना अनेक गोष्टीतून त्यांना ते स्वातंत्र हवे होते.भारत जोपर्यंत आपल्या सीमांमधील,केवळ कृत्रिम नाही तर नैसर्गिक, अगदी तळाशी असलेल्या व्यक्तींना स्वातंत्र्याची ग्वाही देत नाही तोपर्यंत त्याला स्वतंत्र भारत म्हणता येणार नाही.गांधीजी कधीच म्हणत नाहीत की, स्वातंत्र्य हे माझ्यामुळे मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीतील अनेकांचे योगदान पण ते कधी नाकारत नाहीत. ते याच्या ही पुढे जाऊन म्हणतात की, कोणी जर मला त्यांंचा मार्ग योग्य आहे पटवून दिला तर, मी त्याचे अनुकरण करीन आणि त्यांंचा शिष्य होऊन त्यानी दाखवलेल्या मार्गावर चालेन.त्यांना पूर्णतः खात्री होती आपण अशा जगाची निर्मिती करू शकू की जिथे ना गरिबी असेल ना बेकारी, तसेच नसेल तिथे रक्तपात वा युद्धाला स्थान. ‛उद्याचे जग हे अहिंसेवर आधारित असेल.’आपण दैवतीकरण केलं नाही तर आपल्याला महापुरुषांमधला माणूस समजायला मदत होते आणि एकदा एखाद्या महात्म्यातला माणूस आपल्याला आवडायला लागला की, आपण त्याला जास्त समजू लागतो.
आपल्याला जे स्वराज्य मिळाले ते केवळ अहिंसेच्या शक्तीने मिळाले नाही.पण मूळ गोष्ट ही की आपल्याला आपल्या अंतरात अहिंसेचा हवा तितका अनुभव आला नाही. वीराला शोभेल असा अहिंसेचा प्रयोग आपण केला नाही. गांधीजींनी आपल्याला वीराची अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न केला, असे असूनही आपली अहिंसा निरुपायाची अहिंसा होती. गांधीजी ज्या प्रकारचा प्रतिकार इच्छित होते तसा प्रतिकार होऊ शकला नाही. लोकांची त्यांंच्यावर श्रद्धा होती अन् लोक त्यांच्या मागे गेले. पण ती बळवंताची अहिंसा नव्हती, दुर्बलांची अहिंसा होती. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली येथे जी अहिंसक लढाई चालली तीत आपण अहिंसेचे फुटके- तुटके आचरण केले. मनात तर द्वेष ठेवत होतो, अन वरवर अहिंसा दाखवत होतो. परिणामी स्वराज्य आले तरी, अहिंसेने आपण स्वराज्य मिळवले आहे अशी आपल्याला प्रतीति झाली नाही.गांधीजी म्हणतात: ‛मी माझी चूक कबूल केली आहे.आपला(स्वराज्याचा)लढा अहिंसेवर आधारलेला होता असे मला वाटले; पण खरे म्हणजे तो केवळ नि:शस्त्र प्रतिकार होता,आणि नि:शस्त्र प्रतिकार हे दुबळ्यांचे शस्त्र आहे.शक्यता वाढली की त्यातून सहज सशस्त्र प्रतिकार उद्भवतो’. अहिंसेच्या शक्तीचा थोडा चमत्कार तर आपण पाहिला, तरीही त्या शक्तीचा आपल्याला स्वतःच्या अंतरात पडताळा मिळाला नाही. आणि म्हणून आज सुद्धा हिंसा-अहिंसेच्या प्रश्नाचा शेवटचा निर्णय पुष्कळांच्या मनात झालेला नाही.
कोणत्याही लढ्याला यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग व लोकमान्यता ही मिळवावीच लागते. प्रामुख्याने समाजाच्या प्रगतीच्या तीन अवस्था स्पष्टपणे दिसतात.पहिल्या अवस्थेत जंगलाचा कायदा चालतो. त्यात हिंसा आणि स्वार्थाला प्राधान्य असते; दुसऱ्या अवस्थेत कायद्याचे राज्य असते निष्पक्ष न्याय, न्यायालये, पोलीस आणि तुरुंग यांना प्राधान्य असते तर तिसर्या अवस्थेत अहिंसा आणि निस्वार्थीपणा यांना प्राधान्य असते म्हणजेच तिथे प्रेम आणि कायदा हे एकच असतात. सुसंस्कृत मानवतेच्या या शेवटच्या ध्येयाची सिद्धी गांधीजींसारख्या लोकांच्या कार्यामुळे जवळ आली.
युद्ध विज्ञान आम्हाला विशुद्ध हुकूमशाहीकडे घेऊन जाते.अहिंसेचे शास्त्रच आम्हाला शुद्ध लोकशाहीकडे नेऊ शकते.सत्याग्रही दलाचा जय झाला तर समाजाची घडी अधिक चांगली बसते आणि सत्याग्रही दलाचा पराभव झाला तर समाजाची घडी सुधारली नाही तरी बिघडत नाही. उलटपक्षी अत्याग्रही सेना विजयी झाली तरी सामाजिक घडी विस्कटते आणि हरली तर त्याची सर्व घडी उद्ध्वस्त होते हा मूलगामी फरक लक्षात घेतला पाहिजे.इंग्रज भारतात आले, त्यांनी एक अद्वितीय काम केले,जे यापूर्वी कोणी केले नव्हते. इंग्रजांनी शस्त्रे हिसकावून घेतली आणि हिंदी जनतेला पूर्ण नि:शस्त्र बनवून टाकले.कोणतेही कारण असो,कोणीही मनुष्य परवान्याशिवाय शस्त्र जवळ बाळगू शकत नव्हता.अशा परिस्थितीत भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला एक तर नेहमी साठी इंग्रजांचे गुलाम बनून राहावे किंवा एखादे नवे जास्त शक्तिशाली शस्त्र शोधून काढावे. जनतेच्या हातात शस्त्रे नव्हती.अशा स्थितीत जर नि:शस्त्र सामना करायची रीत नसती तर भारत कायमचा गुलाम राहिला असता.परंतु एवढा मोठा देश कायमचा गुलाम राहणे असंभव होते.म्हणून नि:शस्त्र मार्गाचा शोध करण्याची ऐतिहासिक आवश्यकता निर्माण झाली.या धरती वर गांधीजींचे आगमन झाले.परदेशी राज्य आहे त्याला सहकार देण्याचे आपण बंद केले तर ते राज्य तुटून पडेल हा गांधीजींचा विश्वास होता.अतिशय जुलमी सरकारसुद्धा आपल्या शासितांंच्या सहकार्याशिवाय चालूूू शकत नाही. हे खरे आहे की, जुलमी सरकार ही संमती बहुधा बळजबरीने मिळवते.परंतु प्रजेच्या मनातून निरंकुश सत्तेची भिती निघुन जाऊ लागली की निरंकुश सत्ता निष्प्रभ होते. यापुढे गुलामगिरी करायची नाही असा निर्धार ज्या क्षणी गुलाम करतो त्या क्षणापासूनच गुलामगिरीच्या त्याच्या बेड्या निखळून पडतात. तो स्वतंत्र होतो व इतरांनाही स्वातंत्र्याचा मार्ग दाखवतो. स्वातंत्र्य आणि गुलामी या मानसिक अवस्था आहेत. यामुळे, ‛आता मी गुलामगिरी करणार नाही. मी आदेशांचे जसेच्या तसे पालन करणार नाही. जे आदेश माझ्या अंतःकरणाला स्वीकारार्ह वाटत नाहीत त्या आदेशांचे मी पालन करणार नाही’ असे म्हणण्याची पहिली गरज असते. हाच तो गांधीचा राजमार्ग.
प्राचीन ऋषीमुनींनी व धर्म संस्थापकांनी साधुसंतांनी या अहिंसा संकल्पनेला भूतदयेची जोड दिली व तिला काही प्रमाणात विधायक,सामाजिक सेवेचे स्वरूप दिले. कुणाला दुःख देऊ नये ही निरूपद्रवी संकल्पना, त्यानंतर इतरांना दुःख तर देऊ नयेच पण सुख घ्यावे ही विधायक दया संकल्पना आणि जगाच्या सुखासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करावे ही जीवन साधनेची संकल्पना.असा अहिंसेच्या संकल्पनेचा विकास होत गेला.या धार्मिक व नैतिक अहिंसेला सामुदायिक सत्याग्रहाचे रूप देऊन स्वराज्यप्राप्ती असो, समाजपरिवर्तन असो वा विश्वशांती असो अशा सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रात शांतीकारी अहिंसेला क्रांतिकारी शक्ती बनविण्याचे अभूतपूर्व कार्य गांधीजींनी केले.
प्राचीन ऋषींची शिकवण होती की अहिंसेत परिपूर्ण असलेल्या माणसाचं अंत:करण गुलाबाच्या पाकळीहूनही कोमल आणि वज्राहूनही कठोर असायला हवं.आत्मिक बलाने शारीरिक बल जिंकण्याची, मानवाच्या परिवर्तनाची,सत्याग्रह ही एक विलक्षण प्रक्रिया होती.गांधीजींचा दावा होता की सत्य आणि अहिंसेद्वारा स्वातंत्र्यप्राप्ती व्हायची असेल तर विलंब अथवा यातनांची काय तमा..? हिंसा कितीही संघटित असली तरीही तिच्यापेक्षा अहिंसेची शक्ती अधिक आहे.आज ना उद्या हिंसेचा अंत होणारच आहे. परंतु अशा थकव्यानंतर झालेल्या हिंसेच्या अंतातून चिरस्थायी शांततेचा जन्म होत नसतो. मी परमेश्वराच्या शपथेवर सांगतो की समजूतदारपणाकडे जग जर पुन्हा वळलं नाही तर या पृथ्वीवरून हिंसक मानवाचा समूळ नाश झाल्याशिवाय राहणार नाही.. ज्यांचे स्वतःचे हात रक्तांंने माखलेले आहेत ते जगात अहिंसक व्यवस्था निर्माण करू शकत नाहीत.
दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांनी तेथील सरकार विरुद्ध चालविलेल्या चळवळीला गांधीनी ‛पॅसिव्ह रेझिस्टन्स’ नाव दिले होते. यातून त्यांना अपेक्षित असणारा विचार व्यक्त होत नव्हता.आणि या महान युद्धाला इंग्रजी नाव देणे त्यांना लज्जास्पद वाटले. पॅसिव्ह रेझिस्टन्समध्ये प्रेमभावनेला थारा नसतो, तर सत्याग्रहात वैरभावाला थारा नसतो, इतकेच नव्हे तर वैरभाव हा अधर्म मानला जातो. पॅसिव्ह रेझिस्टन्समध्ये, संधी मिळाली तर, शस्त्रबळाचा उपयोग करता येतो; सत्याग्रहात, शस्त्रांचा उपयोग करण्याकरिता उत्तमांंत उत्तम संधी आली तरी तो उपयोग सर्वथैव त्याज्य आहे. पॅसिव्ह रेझिस्टन्स हे पुष्कळ वेळा शस्त्रबळाची पूर्वतयारी म्हणून मानण्यांंत येते. पॅसिव्ह रेझिस्टन्समध्ये विरुद्ध पक्षाला दुःख देण्याची, सतावण्याची कल्पना नेहमी असतेच,आणि दुःख देतांंना स्वतःला क्लेश सहन करावे लागले तर सहन करण्याचीही तयारी असते; तर सत्याग्रहात विरोधी पक्षाला दुःख देण्याचा विचारसुद्धा मनांंत असतांं कामा नये.त्यात स्वतः दुःख ओढून घेऊन, ते सहन करून, विरोधी पक्षाला वश करण्याचाच विचार असला पाहिजे.
‛इंडियन ओपीनियन’ मध्ये ‛पॅसिव्ह रेझिस्टन्स’ला चांगल्यांंत चांगला शब्द शोधून देणाऱ्याला एक लहानसे इनाम त्यांनी जाहीर केले.मगनलाल गांधींनी ‛सदाग्रह’ हे नाव सुचवले हा शब्द निवडण्याचे कारण सांगताना त्यांनी लिहिले की, हिंदी जमातीची चळवळ हा एक मोठा आग्रह आहे आणि तो आग्रह सत् म्हणजे शुभ आहे, म्हणून आपण हे नाव निवडले आहे. पण ज्या आशयाचा समावेश व्हावा अशी गांधींची इच्छा होती त्याचा समावेश या शब्दांंत होत नव्हता, म्हणून त्यांनी ‛सदाग्रहा’चे ‛सत्याग्रह’ केले. सत्त्यात शांती आलीच असे मानून, कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरला की त्यातून बळ उत्पन्न होते, म्हणून आग्रहात बळाचाही समावेश झाला, असे धरून, हिंदी चळवळीला ‛सत्याग्रह’ म्हणजे सत्य आणि शांती यांंतून निपजणाऱ्या बळाचे नाव दिले. बळाच्याच भावनेचे मनांंत पोषण केल्याने आपण दिवसेंदिवस अधिक बलवान होतो आणि जसेजसे आपले बळ वाढत जाते तसतसे सत्याग्रहाचे तेज वाढत जाते.
सत्य आणि अहिंसा पर्वताप्रमाणेच प्राचीन आहे. मी जर काही केलेच असेल, तर या दोन्ही बाबतीत व्यापक प्रमाणात प्रयोग करण्याचे प्रयत्न करून पाहिले. असे करताना माझ्या हातून काही वेळा चुका घडल्या आणि त्या माझ्या चुकांमुळे मी नवे धडे शिकलो.जीवन आणि त्याच्या समस्या अशा रीतीने माझ्या सत्य आणि अहिंसेच्या आचरणात मला अनेकविध अनुभवरूप ठरल्या. माणसाने जर स्वतःच्या साधनांची काळजी घेतली, तर साध्य स्वतःच स्वतःची काळजी घेईल.अहिंसा हे साधन आहे आणि संपूर्ण स्वातंत्र्य हे साध्य.
आज हिंसाचार वाढत्या प्रमाणात दिसतो आहे. म्हणूनच हा हिंसाचार कसेही करून थांबलाच पाहिजे ही आर्त भावनाही उत्कट होत आहे हे लक्षात घेता त्याला निष्प्रभ करून लोकांना शांततेने व प्रसन्नतेने जगता येईल असा पर्याय समाजापुढे आला नाही व समाजाने तो स्वीकारला नाही तर समाजामध्ये लाचारी व बजबजपुरी माजून मानवसंस्कृतीच नष्टप्राय होईल यात शंका नाही. गांधीजींनी अहिंसात्मक सत्याग्रहाच्या रूपाने हा पर्याय जगाला सादर केला आहे.
आज जग निश्चितपणे विनाशाच्या काठावर उभे आहे व त्यापासून त्याला वाचवणे अतिशय कठीण असल्याचे जाणवते आहे. याला कारणं आहेत: विचारसरणीविषयी सुरू असलेला सतत संघर्ष, इतिहासातील कोणत्याही युद्धापेक्षा भयानक युद्धाकडे नेणारा वंशविषयक तीव्र द्वेष आणि कल्पनातीत विध्वंस करू शकणाऱ्या अण्वस्त्र साठ्यात होत असलेली भयावह वाढ. अशा परिस्थितीत माणसाला आपल्या अस्तित्वाच्या रक्षणाकरिता दोनपैकी एका शक्तीची निवड करावी लागेल नैतिक शक्ती वा भौतिक शक्ती. भौतिक शक्ती मानवजातीला आत्मनाशा कडे नेत आहे. गांधीजी नैतिक शक्तीचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते आपल्याला दुसरा मार्ग दाखवतात.(सत्य,अहिंसा,आत्मबल या बद्दल भाष्य करतात.) हा मार्ग नवीन नाही असे तुम्ही म्हणू शकता. परंतु हा असा मार्ग आहे की जग एक तर त्याला विसरले आहे वा त्या मार्गावरून जाण्याचे धैर्य जगाजवळ नाही. परंतु आता या मार्गाची उपेक्षा केली तर आपले अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.आधुनिक शस्त्रास्त्रांच्या काळात अहिंसेचा अर्थ जरी लोकांना उमगला नसला तरी या हिंसेचा अनर्थ मात्र सर्वांना समजून चुकला आहे. हिंसेचा अनर्थ टाळावा म्हणून काहीतरी केलेच पाहिजे असे विचारी लोकांना वाटू लागले आहे. म्हणूनच सर्व क्षेत्रात अहिंसात्मक तंत्राच्या यशस्वीतेबद्दल साशंकता व्यक्त करूनही अनेक विचारी लोक या तंत्राचा अवलंब करून पाहिला पाहिजे या निर्णयावर आले आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
अहिंसेचा खरा आणि व्यापक अर्थ कोणालाही दुःख न देणे हाच आहे. दुःख देणे ही अहिंसेची निषेधात्मक बाजू झाली. अहिंसेची विधेयात्मक बाजूही आहे आणि ती दुसऱ्यांना दुःख मुक्त करणे ही होय. केवळ निषेधात्मक बाजूचे पालन करणारा मनुष्य अहिंसक गणला जाईल, पण त्याला सक्रीय अहिंसक म्हणता येणार नाही. ‛कोणालाही दुःख न देणे’ यांत दुष्ट क्रियेचा अभाव आहे, तर “दुसऱ्यांना दुःखमुक्त करणे” यात सत्क्रियेचे आचरण आहे. खरा अहिंसक तोच की जो अहिंसेच्या दोन्ही अंगांंचे आचरण करील.अत्याचार सहन करणाऱ्या भेकड माणसापेक्षा शस्त्राने त्याचा प्रतिकार करणारा हिंमतवान मनुष्य हा भेकडापेक्षा अहिंसेच्या तत्वाच्या अधिक जवळचा आहे.
{Violence is better than cowardice,Non-violence is the best.}
भेकड व दुर्बल अशा अगतिक व निष्क्रिय अहिंसेपेक्षा अत्याचाराचा हिंसात्मक प्रतिकार श्रेयस्कर आहे. हा गांधीविचार बऱ्याच जाणत्या लोकांनी सजावून न घेतल्यामुळे गांधीजींच्या अहिंसा विचाराचे त्यांनी योग्य मूल्यमापन केले नाही व मग त्याचे अनुकरण तर दूरच राहिले.जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आणि कसल्याही प्रकारच्या गाऱ्हाण्याचे निवारण करण्याकरिता या हत्याराचा उपयोग आपल्याला करता येईल. हे हत्यार उपयोगात आणणाऱ्याची तसेच ज्याच्या विरुद्ध ते उपयोगात आणले जाईल त्याचीही ते शुद्धी करते. या हत्याराचा सदुपयोग कधीही अनिष्ठ ठरण्याजोगा नाही आणि तो कधीही वाया जात नाही.
समाजवादी मित्र गांधीजींच्या सोबत वाद करत म्हणतात की, अहिंसेच्या नीतिशास्त्रात सामान्य जनसमुदायाला रस नाही. प्रत्युत्तरात गांधीजी म्हणाले की, कोणत्या मार्गानं स्वराज्य मिळेल हे जाणून घेण्यात त्यांना निश्चितच रस आहे. ‛कोट्यावधी लोक भूमिगत होऊ शकत नाहीत. तशी गरजही असू नये. काही थोडी निवडक लोक असं स्वप्न पाहू शकतात की गुप्तपणे कार्यवाही करून ते कोट्यावधी लोकांसाठी स्वराज्य आणू शकतात. परंतु हे चमच्यानं दुध पाजणं होणार नाही काय.? जाहीर आव्हान आणि उघड वर्तनाचंच लोक अनुकरण करू शकतात.म.गांधीना हिंसेने मिळवलेले स्वातंत्र्य नको होते. अहिंसा आणि सत्याग्रह ही त्यांची मूल्ये होती. शिवाय सामान्य माणसांची बलस्थाने होऊ शकणारी तीच एकमेव विचारसरणी होती. देशातला सामान्य माणूस पुढे होणार नसेल आणि हाती बंदुका घेतलेली माणसे स्वातंत्र्य आणणार असतील, तर येणारे स्वातंत्र्य आपल्यासोबत हुकूमशाही आणील त्यांना लोकशाही आणता येणार नाही. याउलट सामान्य माणसे हाती शस्त्र कधीच घेणार नाहीत,अशा माणसांचे एकमेव बलस्थान त्यांची सहनशक्ती हे असते. या सहनशक्तीचे शक्तिस्थानात रूपांतर करणे, हा गांधीच्या अहिंसा व सत्याग्रह या मूल्यांचा हेतू होता.खऱ्या स्वातंत्र्याची निकड सर्वांना- पुरुष, स्त्रिया आणि मुलांनाही जाणवायला हवी. ते स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करणं हीच खरी क्रांती आहे.
ज्या स्वातंत्र्याची फळं सर्वांना समान रीतीनं चाखता येतील असं स्वातंत्र्य त्यांना हवं होतं परंतु सर्वात निर्बल लोक स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आणि रक्षणासाठीच्या चळवळीत सहभागी होणार नाहीत तोवर हे संभव नाही असं त्यांचं मत होतं.असं घडणं अहिंसक मार्गानंच शक्य आहे. त्यामुळे मी एकटाच राहिलो तरी अहिंसा हेच भारतीय स्वातंत्र्याचं एकमेव साधन आहे असं समजून त्याचंच मी समर्थन करत राहीन.जगातील सर्व शोषित राष्ट्रांसाठी भारत एक उदाहरण आहे. कारण भारताचा लढा उघडा आणि नि:शस्त्र आहे. सर्वांनी बलिदान करावं अशी त्याची हाक आहे आणि असं करत असताना बेकायदेशीर सत्ता बळकावणारांना देखील दुखापत करायची त्याची इच्छा नाही.सत्याग्रही हा शत्रू ला नेहमी आपल्या संभाव्य मित्रा प्रमाणे मानतो.
भयभीत स्थितीत जे लोक आहेत त्यांनी अहिंसेचे पालन कसे करावयायचे.? त्यांना “तुम्ही मारू नका” असा उपदेश केला तर तो त्यांना पथ्यकर वाटेल आणि ते न मारता पळून जातील.! पण अहिंसा जेव्हा “मारू नका” असा आदेश देते तेव्हा त्याच बरोबर असाही आदेश देते की “मारू नका; पण संपूर्ण प्रतिकार करा.” म्हणजे अहिंसेचा अर्थ अहिंसक प्रतिकार असा होतो. गांधी म्हणतात, “Resist evil with all your might, but resist nonviolently पापाचा प्रतिकार तुमची पराकाष्टा करून करा,पण तो अहिंसक रीतीने.”
“ ज्याप्रमाणे मी एखाद्या अंधाला सुंदर दृश्ये बघण्याचा आनंद उपभोगण्याची लालूच दाखवू शकत नाही, त्याचप्रमाणे मी एखाद्या भ्याड माणसाला अहिंसेचा उपदेश करू शकत नाही. अहिंसा म्हणजे शौर्याचा सर्वोच्च बिंदू आहे. ”
योग्य किंवा न्याय्य काय ते पटवून देण्याची व मनुष्यप्राण्यांंत असलेल्या बुद्धीला आणि सहसंवेदना वृत्तीला आवाहन करून मन पालटविण्याची सत्याग्रह ही एक पद्धती आहे.सत्याग्रह म्हणजे दुसरं काही नसून राष्ट्रीय जीवनात सत्य आणि सौजन्य यांचा प्रवेश होय.सत्याग्रह म्हणजे स्वतः विषयीचा पराकोटीचा शून्यभाव, पराकोटीची नम्रता, सहनशीलता व अत्यंत प्रखर निष्ठा.आपले मन शत्रूच्या आधीन न करणे म्हणजे तुम्ही कोणत्याही मोहाला बळी न पडणे. मनुष्य हा पुष्कळ वेळा लोभाच्या आणि गोड गोड शब्दांच्या जाळ्यात सापडण्याइतका दुर्बळ मनाचा असतो. आपल्या रोजच्या सामाजिक व्यवहारात आपण हे घडत असलेले पाहतो. दुर्बळ मनाचा मनुष्य कधीही सत्याग्रही होऊ शकणार नाही. सत्याग्रह्याने नकार दिला म्हणजे तो नकारच आणि होकार म्हणजे होकारच असतो.सत्याग्रह म्हणजे सत्याची कठोर साधना आणि सत्याप्रत पोचण्याचा पक्का निर्धार. सत्याग्रह सौजन्यपूर्ण असतो तो कधी इजा करत नाही. सत्याग्रहाच्या मागं क्रोधाची अगर द्वेषाची भावना असता कामा नये. सत्याग्रहात कपटाला फसवेगिरीला अथवा कोणत्याही प्रकारच्या असत्याला स्थान नाही.सत्याग्रहात हिंसा बसत नाही. हा एक विचार आहे,आणि आपण त्यासाठी लायक बनावयाचे आहे. प्रेमाचे आक्रमण व्हायला पाहिजे. याला ‛प्रतिरोधी प्रेम’ असे नाव दिले आहे.यात समोरचा जितका दोषयुक्त असेल तितकेच आपण गुणवान व्हावयाचे आहे. समोरच्याला आपल्या आत्म्यातच स्थान द्यायचे आहे. याच वृत्तीने सत्याग्रह होऊ शकतो.
अत्यंत दुर्बळ असलेले राष्ट्रसुद्धा, जर अहिंसेची विद्या शिकले तर, बाहेरच्या हल्ल्यापासून स्वतःला निर्भय राखू शकेल. परंतु, एखादे लहानसे राष्ट्र कितीही शस्त्रसंपन्न झालेले असो, शस्त्रसज्ज अशा राष्ट्रांंच्या बलवान जुटीपुढे ते टिकू शकणार नाही. त्याला त्या राष्ट्रगटापैकी कोणत्यातरी एका राष्ट्रात सामील होऊन जावे लागेल किंवा त्याच्या संरक्षणाखाली राहावे लागेल.भारत जेव्हा स्वावलंबी होईल, प्रलोभन व शोषण यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होईल तेव्हा पूर्वेकडील म्हणा वा पश्चिमेकडील म्हणा कोणतीही शक्ती त्याच्याकडे लोभी दृष्टीने पाहू शकणार नाही व महागड्या शस्त्रास्त्रांशिवाय आपण सुरक्षित असल्याचे त्याला जाणवेल. त्याची आंतरिक अर्थव्यवस्था कोणत्याही आक्रमणाच्या विरोधात सर्वात मजबूत अशा गडकोटाचे काम करील.
अहिंसेचा सिद्धान्त गांधीनीं व्यवस्थित स्वरूपात राष्ट्रापुढे १९१९ साली ठेवला आणि १९२० मध्ये तो राष्ट्राने स्वीकारला.१९२० पासून १९४३ पर्यंत फक्त २३ वर्षाच्या अवधीत गांधींच्या अहिंसेचा प्रयोग झाला. आक्षेपकांचे म्हणणे असे की या २४ वर्षात राष्ट्र अहिंसेमुळे पुळचट आणि नेभळट बनले आहे. असे म्हणणे हे किती हास्यास्पद आहे.! १९२० साली साऱ्या राष्ट्रात जे चैतन्य पसरले, असहकाराची जी प्रचंड लाट उसळली, ते काही पुळचटपणाचे लक्षण नव्हते. त्यानंतर दिवसेंदिवस राष्ट्राची तेजस्विता वाढतच चालली होती.पुळचटपणा आणि नेभळटपणा दिसून येत असेल तर तो पूर्वीच्याच अवगुणांचा अवशेष आहे. अहिंसक प्रतिकाराचे शस्त्र हातात आल्यापासून तर राष्ट्राची प्रतिकाराची शक्ती वाढतीच आहे आणि प्रतिकार शक्तीच्या वाढीबरोबरच स्वाभिमान आणि तेजस्विताही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्र नेभळट झाले आहे, असे म्हणणे हे ऐतिहासिक सत्याची अवगणना करण्याबरोबर आहे. क्रांतिकारकांना गांधीजी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ क्रांतिकारक वाटले कारण त्यांच्यात लढण्याची संकल्पशक्ती, साहस, संकटांना हसत हसत सामोरे जाण्याची वृत्ती आणि प्रतिकाराची दुर्दम्य भावना होती.हक्काचा आग्रह धरण्या ऐवजी जर प्रत्येकजण कर्तव्य करू लागला तर मानव समाजात लगेच सुव्यवस्थेचा कारभार प्रस्थापित होईल.जीवनाच्या संघर्षात आपण द्वेषाला प्रेमाने,असत्याला सत्याने,हिंसेला आत्मक्लेशाने सहज जिंकू शकू.
खाजविल्याने खरुज नाहीशी होत नाही उलट वाढते, त्याप्रमाणे हिंसेच्या हिंसात्मक प्रतिकाराने हिंसाच वाढणार. म्हणूनच अहिंसात्मक सत्याग्रहाचा पर्याय विचारात घेणे मानवतेच्या रक्षणार्थ अवश्य झाले आहे.
हिंसा मिटत नाही आणि अहिंसा पटत नाही, अशी द्विधा मनस्थिती जगाची आहे. जोपर्यंत आपण परस्परविरोधी गोष्टींविषयी बाह्य उपायांचा विचार करू, लढाई- युद्ध वगैरे स्थूल उपायांच्या वर उठणार नाही, तोपर्यंत जगाची धडगत नाही. म्हणून सत्याग्रहाची आवश्यकता आहे.आपण अहिंसेने स्वातंत्र्य मिळविले तर त्याच शस्त्राने आपण त्याचे रक्षणहि करू. तेवढा विश्वास जर आपल्यात आला नसेल तर आपली अहिंसा म्हणजे केवळ एक प्रसंगापुरते योजलेले साधन आहे, ती हिणकस आहे, ते शुद्ध सोने नव्हे. गांधीजींच्या राजकीय शब्दांंचे व्याकरण हे अगदी निराळे होते. परंपरागत शब्द त्यांना घ्यावे लागत, कारण जगाला त्यांची भाषा अगर त्या भाषेचा अर्थ समजावून देणे कठीणच होते. म्हणून अत्याचारी साधनांनी सिद्ध झालेले रूढ अर्थ गांधींच्या अन्यत्याचारी साधनांना लावणे हे बरोबर ठरणार नाही. त्याकरिता कोणी जर असे म्हटले की, गांधीनी स्वातंत्र्य आणले नाही, तर तसे म्हणण्याचा त्याला हक्क आहे. जगाला स्वातंत्र्याचा अर्थ जो ठाऊक आहे, तो मारावे, मरावे, रक्त सांडावे, विध्वंस करावा, पिढ्यान पिढ्या वैर शत्रुत्व टिकावे, वगैरे वगैरे. गांधीजींच्या स्वातंत्र्याची साधने निराळी होती, प्रतिकाराचे मार्ग निराळे होते आणि म्हणून जे स्वातंत्र्य आले ते रक्तहीन व वित्तहानिहीन परिस्थितीतून आले. संबंध तोडणे अगर तुटणे हे त्यांंच्या स्वातंत्र्याचे ध्येय नव्हते. म्हणून एक निराळ्या प्रकारचेच स्वातंत्र्य भारताला पहावयास सापडले.
गांधीजींची स्वातंत्र्याची कल्पना ही अशीच नाविन्य पूर्ण होती. स्वातंत्र्य याचा अर्थ ते तोडफोड असा करीत नसत. बेळगाव काँग्रेसमध्ये त्यांनी आपली स्वराज्याची कल्पना विशद केली होती. त्यांना हिंदुस्थानातून इंग्रज निघून गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळाले असे वाटत नव्हते. ते म्हणत, मला ब्रिटिश राष्ट्रकुटुंबात भागीदारी पाहिजे, ती मिळत नसेल तर समानता पाहिजे. जगातील मानवाची प्रगती तुटकपणाने, लहान-मोठी राष्ट्रे निर्माण करून अगर राखून होणार नाही. समान मनोवृत्तीच्या देशाचे संघ व्हावेत व त्यांंची शक्ती गोरगरीबांच्या हालअपेष्टा निवारण करण्याकरिता वाढावी असे त्यांना हवे होते. राष्ट्रसंघ हे सहकारी राष्ट्राचे संघ व्हावेत असे त्यांना पाहिजे होते. पण जेव्हा हे ब्रिटिशांना पटेना व दुसऱ्या महायुद्धात त्यांची वृत्ती बदलेना, तेव्हा गांधी म्हणाले, ‛आता तुम्ही हिंदुस्तान सोडा.’
सत्याग्रह ही प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अत्यंत प्रभावशाली पद्धतीने पैकी एक पद्धती असल्यामुळे सत्याग्रही हा इतर सर्व साधने अगोदर अजमावून पाहून संपवितो आणि शेवटी सत्याग्रहाचा अवलंब करतो. म्हणून तो प्रस्थापित सत्ताधिकाऱ्यांंच्याकडे वरचेवर आणि सतत जाईल, लोकमताला आवाहन करील व ते शिक्षित करील, जो कोणी त्याची बाजू ऐकून घेण्याची इच्छा धरील त्या प्रत्येकापुढे ती तो शांतपणे आणि निर्विकारपणे मांडील, आणि हे सर्व मार्ग अजमावून संपविल्यानंतरच तो सत्याग्रहाचा अवलंब करील.
ज्यांना अन्याय सोसावा लागतो त्यांनीच सत्याग्रह करावा हे सत्याग्रहाचे सारभूत तत्त्व आहे. ज्यांना सहानुभूतीचे सत्याग्रह ही संज्ञा यथार्थपणे देता येईल अशा सत्याग्रहांंची उदाहरणे सुद्धा कल्पिता येतील. अन्याय करणाऱ्यांच्या मनात पालट घडवून आणणे, त्यांच्यातील न्यायभावना जागृत करणे आणि ज्यांंच्यावर आपण अन्याय करतो त्यांंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्यावाचून आपल्याला वाटेल तसा अन्याय आपण करू शकणार नाही हे त्यांंच्या प्रत्ययाला आणून देणे, हा सत्याग्रहाचा मूळ हेतू आहे.आज देशात विविध प्रश्नांसाठी होणारी पेड आंदोलने आपण पाहिलीच आहेत.
मोहनदास करमचंद गांधी यांना, महात्मा गांधी आणि राष्ट्रपिता म्हणून उगाच नाहीत म्हणत..! महात्मा गांधी जेवढे देशवासियांमध्ये प्रिय होते, तेवढेच ते परदेशातही होते. परदेशातही त्यांना मान-सन्मान मिळाला. आपण भारतीय लोक खूप भाग्यवान आहोत महात्मा गांधीजींचा जन्म आपल्या देशात झाला. आणि या स्वराज स्वातंत्र्य लढ्याला त्यांचे नेतृत्व लाभले.आजही जी काही परदेशांत भारतीयांची ओळख आहेती गांधीजींके देशवासी अशीच आहे.आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे.
गांधीजींच्या सत्तरी निमित्य सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गौरव ग्रंथ संपादित केला होता. त्या ग्रंथासाठी स्मट्सना लेख लिहायला सांगितला होता. त्यात ते लिहितात, ‛तेव्हाही गांधींबद्दल माझ्या मनात अतीव आदर होता. अशा माणसाशी शत्रुत्व करणे माझ्या वाट्याला आले. पण त्यावेळच्या त्यांच्या चळवळी माझ्यासाठी तापदायक होत्या हे कबूल केले पाहिजे. पण हाच ‛तापदायक गांधी’, ‛चलेजाव’ आंदोलनादरम्यान अटकेत असतो, तेव्हा बाहेर हिंसाचार सुरू असतो. या हिंसाचाराला गांधीच जबाबदार असून त्याला गांधींचीच फूस आहे, असा अपप्रचार ब्रिटिश सरकार मोठ्या प्रमाणावर करीत असते. तेव्हा जनरल स्मट्स आपल्याच सरकारवर संतापतात आणि पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात, ‛महात्मा गांधींना पंचमस्त्तंभीय म्हणणे ही मूूर्खपणाची सीमा आहे.ते फार महान आहेत. जगातील महापुरुषांतच त्यांची गणना करावी लागेल.’
एका स्त्री पत्रकाराने गांधीजींना प्रश्न विचारला “ॲटम बॉम्बची निर्मिती थांबविण्याचा उपदेश तुम्ही अमेरिकेला कराल काय.?” “अवश्य करीन.अहिंसेचं शस्त्र ॲटम बॉम्बपेक्षाही मोठं आहे.” अहिंसेच्या या पुजाऱ्यानं बूमरँग सारखं उत्तर दिलं.! युद्ध पिपासेने पछाडलेल्या या जगात गांधी विवेकाचा आवाज आहे.
लॉर्ड सॅम्युएल म्हणाले, “ स्वातंत्र्याचे विधेयक हे म्हणजे भावी पिढ्यांंना दाखवून दिलेला आदर्श आहे. युद्ध न करता शांततेकरिता केलेला तो तह आहे. मागे दृष्टी टाकल्यास हे म्हणणे योग्य ठरेल की,या भांडणाच्या काळात जर उघड बंड झाले नसेल तर त्याचे श्रेय पुष्कळ प्रमाणांंत गांधीजींच्या वजनाला दिले पाहिजे..जर ही वृत्ती नसती तर हिंदुस्थानांत घटनांना निराळेच वळण लागले असते.”
एका पत्रलेखकाने बर्नार्ड शॉ यांचे सुप्रसिद्ध वाक्य उद्धृत करून गांधींना विचारले, ‛यातील कोणत्या तत्त्वाप्रमाणे इंग्रज हिंदुस्थान सोडत आहेत.?’
बर्नार्ड शॉचे वाक्य : ‛ इंग्रज माणूस हा केव्हाही चुकत नाही. तो प्रत्येक गोष्ट तत्त्वाला धरून करतो. तो तुमच्याशी लढला तर देशभक्तीच्या तत्वाकरिता; त्यांनी तुम्हाला लुबाडले तर धंद्याच्या तत्वाकरितात; त्यांनी तुम्हाला गुलाम केले तर साम्राज्यशाही तत्वाकरिता; राजाला त्यांनी पाठिंबा दिला तर राजनिष्ठेच्या तत्वा करिता व त्यांचे डोके उडवले तर प्रजासत्ताक तत्वा करिता.’
गांधींनी उत्तर दिले, ‛माणसाला आत्मवंचनेच भयंकर खोड आहे. इंग्रज माणूस त्यात सर्वश्रेष्ठ आहे. इंग्रज हिंदुस्थान सोडावयास जे तयार झाले, त्याचे कारण राजकीय व आर्थिक दृष्ट्या हिंदुस्थानला गुलामगिरीत ठेवणे त्यांना अशक्य झाले म्हणून.’
अर्नोल्ड जोसेफ टॉयनबी हे एक जगप्रसिद्ध इंग्रजी इतिहास लेखक आहेत. गांधी शताब्दीनिमित्त प्रकाशित झालेल्या ‛महात्मा’ या ग्रंथात ते लिहितात:
“ गांधीजी यांनी जसे त्यांच्या देशावर उपकार केले तसे माझ्या देशावर केले. गांधींनी ब्रिटिशांना हिंदुस्थानवर राज्य करणे अशक्य केले; पण त्याच वेळी त्यांनी आम्हाला द्वेष किंवा अपमान याची झळ लागू न देता हिंदुस्तान सोडणे शक्य केले. त्यांनी हिंदुस्थान सरकारला ब्रिटिशांच्या हातून हिंदी हातात रक्तपाताविना जाणे शक्य केले; त्यांनी हिंदी व ब्रिटिशांना मित्र बनविणे, राजकीय दृष्टीचे संबंध संपल्यावर त्यांना समानतेच्या भूमिकेवर आणले. मानवामानवातील जे नैसर्गिक संबंध आहेत,ते त्यांनी स्थापले. जोपर्यंत शासक व शास्ते असे नाते असते तोपर्यंत असे समानत्व स्थापत्ता येत नाही. या गुंतागुंतीतून बाहेर काढण्यास मदत करताना गांधींनी ब्रिटिशांची फार उल्लेखनीय सेवा केली.कारण स्थापलेल्या साम्राज्यातून एखाद्या राष्ट्राला बाहेर काढणे हे साम्राज्यस्थापनेपेक्षा फार कठीण काम असते.”
महात्मा गांधीजींनी जगाला शिकविले की,मारण्यापेक्षा मरणे हे अधिक चांगले.. निरागस माणसाने स्वेच्छापूर्वक केलेला त्याग हे उन्मत्त जुलमाला देण्यात आलेले सर्वात प्रभावी उत्तर आहे व माणसाने वा देवानेही याहून अधिक प्रभावी उत्तराची कल्पना केलेली नसेल.
अहिंसा परमो धर्म..
अहिंसेचे सम्यक् दर्शन घडविण्याच्या कामात लिहिणाऱ्याला यश मिळणार नाही, असा इषारा मी देऊन ठेवीत आहे.
M. K. GANDHI…
: *॥ मोहनदास ते महात्मा ॥*
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी्…. जगभरातील मोठया समुहावर या नावाचा खूपच बडा प्रभाव आहे. हा प्रभाव काही एका रात्रीत निर्माण झाला नाही.78 वर्षांचे कृतीशील , प्रयोगशील , निर्भय जीवन यामागे कारणीभूत आहे.गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी जन्माला आलेल्या मोहनदास या मुलाचा सुरु झालेला प्रवास 78 वर्षांच्या ध्येयवादी आयुष्याच्या प्रखर तपस्येने संपला , नव्हे संपवला गेला. मिळालेले सारे आयुष्य मात्र या माणसाने प्रत्येंक क्षण न् क्षण जीवनभर जोपासलेल्या मानवतावादी मुल्यांकरता काटेकोरपणे खर्च केला.अत्यंत वधिष्णू पध्दतीने या माणसाने स्वत:ला घडवले. पोरबंदर संस्थानात असताना झाालेले काही संस्कार जीवनभर काही तसेच जोपासले नाहीत. त्या संस्कारांनाही सततची परिक्षा अनिवार्य होती. काळाच्या पटलावर जे टिकण्यासारखे होते त्यांना जीवनभर जोपासले गेले आणि जीवनाचा प्रवास “ विधायक वर्धिष्णू दिशेने “ करता करता कसाला न लागलेले संस्कार बदलण्याची तयारी करत हा माणूस जगला.स्वत:च स्वत:ला घडवताना छन्नी हातोडीचे कठोर घाव देहावर घालायला हा माणूस विसरला नाही. स्वत:च्या बाबतीत कठोर असणारा हा माणूस जेव्हा “ समाजमान्य व्यापक पातळीवरचा लोकनेता “ होता , अगदी तेव्हाही त्याने समाज घडवणुकीची आपली पध्दती बदलली नाही. ज्या समाजात काही विधायक बदल घडवायचे आहेत त्या समाजात आणि आपल्यात कायमपणे “ एक पावलांचेच अंतर “ राहील याची आवश्यक ती काळजी वाहीली. दोन पावलांचे अंतर कृतीशील बदल घडवत नसतात हे पक्के ठाऊक असणारा हा लोकनेता होता.
लहानपणी एका विशिष्ट कोषात जगणारा मोहनदास आपल्या तरुणपणी काही नवीन गोष्टीना भिडायला शिकला्.मातृभक्ती पोटी इंग्लंडमधील वास्तव्यात मांस , मदिरा , मदिराक्षी यांच्यापासुन कटाक्षाने स्व्त:ला दूर ठेवणारा मोहनदास आईच्या मृत्यूनंतरही या गोष्टी वर्ज्य करत राहिला.अत्यंत साधी राहणी अवलंबणारा मोहनदास शाकाहारी बनला. दारुला कधीही स्पर्श केला नाही.लैंगिक वासनांचे चोचले पुरवण्यासाठी मदिराक्षीच्या वाटयाला गेला नाही.वय वर्षे 24 ते 45 अशी तब्ब्ल 21 वर्षे दक्षिण आर्फिकेत राहून , तिथेच आपले “ सत्याग्रही प्रयोग “ यशस्वी करुन आणि “ महात्मा “ या उपाधीने गौरविला जाऊन मोहनदास महात्मा गांधी बनूनच भारत देशात कायमच्या वास्तव्याला आला.तेव्हा वय झाले होते 45 वर्षे. पुढील 33 वर्षे आपल्या मायभूमीत राहून या देशाची अहोरात्र सेवा केली आणि भारत देशाचे पहिले “ राष्ट्पिता “ होण्याचा सन्मान त्यांच्या वाटयाला आला.गुजरात मध्ये जन्म झाला खरा,परंतू या माणसाने स्वत:ला प्रांतवादातून मुक्त केले.तो देशाच्या व्यापक प्रांगणात अगदी निष्ठेने उभा राहिला आणि तो भारतमातेचा सुपुत्र बनला.आणखी पुढे जात त्याने अवघ्या विश्वाला गवसणी घालत “ जगाचा शांतिदूत “ बनला.अवघे विश्व हेच या माणसाचे आकाश होते.प्रांतवादाच्या आणि देशीय सीमा ओलांडून विश्वनागरीक बनण्यात हा महात्मा कमी पडला नाही.या त्याच्या प्रयोगातच त्याने प्रांतवादाबरोबरच , जात टाकली आणि धर्माची कालबाहय बंधने झुगारली.कोणत्याही धर्मग्रंथाचे अवाजवी ओझे या माणसाने वाहीले नाही की कोणत्याही अस्मिेतेच्या वर्तुळात तो बांधला गेला नाही.आपल्या कटटरतावादी भक्तांची जत्रा भरवली नाही की आपल्याला मिळालेल्या जैविक कुटुंबापुरतीच तो मर्यादीत राहिला नाही.अवघे जग हेच आपले कुटुंब मानून तो जगत राहीला.आपल्या वाणीला अध्यात्मवादी भाषेची ठेवण जाणीवपूर्वक लावत तो समाजाशी बोलू लागला.समाजातील सर्व घटकांची वेदना तो आपल्या कानांत साठवत राहीला. त्या वेदनांना आपल्या हृदयात जपू लागला आणि शोषितांचा आवाज बनून परंपरावादी वर्गाला आव्हान देऊ लागला.त्याची अध्यात्मवादी भाषा आणि शोषीतांचा आवाज बनण्याची कृती परंपरावादी लोकांना अंतर्बाहय जाचू लागली. कारण धार्मिक , सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रात तो “ विधायक हस्तक्षेप “ करु लागला.तो निरीश्वरवादी नसल्याने परंपरावादी वर्गाला त्याला टाळता यंईना.आणि तो जे बोलेल आणि कृती करेल त्याला बहुसंख्य समाजात मान्यता मिळू लागली.मोठया समाजात मिळणारा पाठिंबा आणि समाजाची घडी बदलण्याचा या महात्म्याचा प्रयोगशील अवतार सनातन्यांना झोंबू लागला. पण “ बहूजन हिताय , बहूजन सुखाय “ हा आपला मुलमंत्र हा महात्मा विसरला नाही…कधीच.
अगदी स्पष्टपणे सांगायचे तर,गांधी नावाचा माणूस हा “ अजातशत्रू “ नव्हता. हा माणूस आपले जीवन एखादया खुल्या किताबाप्रमाणे सर्वाना उलगडत राहिला. दक्षिण आर्फिकेत असताना ज्या सार्माज्यवादी सत्तेशी दोन हात करावे लागले तीच साम्राज्यवादी सत्ता अधिक क्रुर प्रमाणात त्याच्या मायदेशाला ओरबाडत होती.सुरुवातीचा बराच काळ गांधी नावाच्या नेतृत्वाला भारतातील इतर काही मोठया नेत्यांप्रमाणे “ इंग्रजी सत्ता ही देवाची देणगी “ असेच वाटायचे. पण 1919 साली जालीयनवाला बागेतील हत्याकांड झाले आणि गांधींची खात्री पटली की , हे सैतानाचे राज्याचे रुप आहे.इथून पुढे या सैतानाच्या सत्तेशी दोन हात करण्यासाठी गांधी आपल्या सर्व ताकदीने उतरले आणि त्यांनी या सत्तेला “ चले जाव “ असे सांगत लोकलढयाच्या माध्यमातून भारत स्वतंत्र केला.जे साम्राज्यवादी इंग्रजी शासन जगाच्या 26% इतक्या भुभागावर आपले वर्चस्व राखून होते आणि ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य कधी मावळत नव्हता असे सांगितले जाते त्याच साम्राज्यवादी इंग्रजी सत्तेला पायउतार करण्यात गांधी नावाच्या नेतृत्वाचा वाटा सिंहाचा होता.हे कसे काय शक्य झााले ? मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाने ही किमया कशी घडवून आणली ? याचे एका वाक्यातील उत्त्तर म्हणजे “ लोकलढा उभारुन “. स्वातंत्र्य हे आपोआप मिळणार नाही.त्याकरता संघटित व्हावे लागेल,लढे करावे लागतील,या लढयाकरता सर्वजातीय व सर्वधर्मीय लोकांचा कृतीशील सहभाग लागेल,याकरीता बलिदाने दयावे लागतील,आपापसातील सर्व प्रकारचे भेद टाळावे लागतील याचे “ लोकशिक्षण “ या माणसाने भारतीय जनतेला व्यापक पातळीवर दिले. यातूनच मग लहानगा शिरीषकुमार उभा राहिला आणि अरुणा असफ अली पुढे आली. इथेच नेहरु आणि सरदार यांच्याबरोबरीने मौलाना व गफारखान उभे ठाकले.याच मांदियाळीत एका वेगळया पण समांतर ध्येयाच्या वाटेने भगतसिंग हुतात्मे झााले आणि सुभाषबाबूनी आझााद हिंद सेना उभारली.एक प्रचंड विधायक कल्लोळ भारतभुमीवर तयार झााला आणि यामध्ये ब्रिटीश साम्राज्यवादी सत्ता नेस्तनाबूत झाली. नि:संशय या लढयाचे सेनापती म्हणून आपण मोहनदास करमचंद गांधी या माणसाला “ राष्ट्रपिता “ म्हणून गौरवले.तो या सेनापतीचा सार्थ सन्मान होताच. परंतु या माणसाने तिसऱ्या जगाला दिलेली “ सत्याग्रही लढयाची पध्दती , अहिंसेचा आणि शांततेचा दाखवलेला मार्ग ,श्रमप्रतिष्ठेचे सांगितलेले महत्व् आणि लोकशाहीत सामान्य माणसाला दाखवलेली “ निर्भयी जीवनाची वाट “ या गोष्टी आचरणात आणणे जरूरी आहे.याकरताच मोहनदास गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास जाणून घ्यायला हवा.
( लेखक हे गांधी यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे “ निर्भय “ नावाच्या पुस्तकाचे लेखक आहेत . )
: ▪ गांधी समजून घेताना….
तत्त्वनिष्ठा, साधनशुचिता, सत्य आणि नैतिकतेचा मोठा अभाव असण्याच्या काळात गांधीला कसे समजून घ्यायचे? हा प्रश्नच आहे.
विशेषतः बदलत्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर म्हणजे ज्या काळात धर्म आणि जातीचे प्राबल्य आत्यंतिक वेगाने वाढत चालले आहे .सत्ता किंवा सत्तेच्या जवळ राहून स्वतःला सुरक्षित ठेवू पाहणाऱ्या भयग्रस्त राजकीय नेत्यांनी व्यापलेला आजचा काळ शिवाय भ्रष्टाचार करून विदेशात पळापळ करणाऱ्या किंवा स्वतःच्या तीव्र महत्त्वाकांक्षेपोटी साऱ्या निष्ठा वगैरे बेमालूमपणे झिडकारून अरेरावीची आणि भ्रष्ट फिलॉसॉफी रुजत चाललेल्या काळात सुमारे दिडशे वर्षांपूर्वी गांधी नावाचा एक माणूस जन्माला आला होता आणि तो पुढे ‘राष्ट्रपिता’ वगैरे झाला, या गोष्टीवर खरंच विश्वास बसणे कठीण आहे, पण हे सत्य आहे.
मानवतावादी नितीमूल्यांचा पुरस्कर्ता असणारा आणि नैतिकता ज्याच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे असा गांधी एक तत्त्वविचार आहे. ज्याने धर्म आणि नीतीची यथायोग्य सांगड घालून भारतीय इतिहासाला एक नवे वळण दिले.
जो केवळ नैतिक सामर्थ्याने अहिंसात्मक मार्गाने लढला, हे कदाचित आजच्या पाशवी आणि हिंस्र मनोवृत्तीच्या लोकांना सांगूनही पटणार नाही. पण हेही सत्य आहे!
अंत:प्रेरणेवर अधिक विश्वास ठेवणारा, सहिष्णुतेला प्राधान्य देणारा हा माणूस बघता बघता ‘महात्मा’ झाला, हा सगळा प्रवास केवळ थक्क करणारा आहे.
गांधी हा एक लोकविलक्षण संसारी माणूस होता, जो आपल्या कणखरतेने आणि तितक्याच विनम्रतेने एक अद्भुत क्रांती करतो. अहिंसात्मक मार्गाने झालेली ही क्रांती अविश्वसनिय वाटत असली तरी हेही सत्यच.
सौम्य, शालीन तरीही करारी गांधीने या देशाला शतकाहून अधिक काळ व्यापून टाकले आहे यातच गांधींचे थोरपण सामावले आहे.
अर्थात असे असले तरी त्यांच्याविषयीची द्वेषभावना अजूनही उफाळून येतेच. एकदा त्यांची हत्या झालेली असली तरी गांधी अजून जिवंत आहेच. म्हणून या गांधीला अजूनही गोळ्या घातल्या जातातच. पण गांधी अजून मेलेला नाही. मरणारही नाही. समज- अपसमजाच्या सीमारेषेवर गांधी सतत हेलकावे खात राहणार आहे. कारण गांधी हा केवळ माणूस नाही, तो एक विचार आहे. ‘गांधीवाद’ ही एक तत्त्वप्रणाली आहे.
त्यांच्याविषयी मतभेद जरूर आहेत- म्हणजे फाळणी, जातव्यवस्थेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांच्या विचारातला अध्यात्मवाद, शिवाय त्यांच्या धर्मविचाराला काही मर्यादा नक्कीच आहेत; पण म्हणून गांधीच अमान्य करणे म्हणजे एका सत्त्वसंपन्न युगाला नाकारण्यासारखे होईल.
सर्वधर्मसमभावाची आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका घेऊन स्वातंत्र्य चळवळीला लोक आंदोलनाचे अतिभव्य रूप देऊन लढणाऱ्या या महात्म्याची गेल्यावर्षी शतकोत्तर सुवर्ण जयंती झाली.
लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असणाऱ्या गांधींना केवळ नोटेवर छापून किंवा भिंतीवर टांगून अमर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे जागरण करून नवा भारत घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ????????????????
◾️ पी. विठ्ठल
………………………………..
: भारताचे माजी पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्त्री यांची ११६ वी जयंती..
भावपूर्ण आदरांजली
२ ऑक्टोबर १९०४ – ११ जानेवारी १९६६
भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्याकडे स्वत:चे घर,कार काही नव्हते . पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मुलांनी हट्ट धरला कि तुम्ही आता पंतप्रधान आहात तर तुमच्याकडे स्वत:ची गाडी असायला हवी.
त्याकाळी फियाट ची किंमत १२००० रुपये होती. त्यांनी आपल्या सचिवाला सांगितले की, माझी बँक खात्यामध्ये कीती रुपये आहेत ते तपासून मला सांगा . बँकेत फक्त ७००० रुपये होते. हि गोष्ट जेंव्हा मुलांना कळाली तेंव्हा मुलांनी सांगितले की आपल्याला कार नको.
पण शास्त्रीजी म्हणाले आपण बाकीची रक्कम बँके कडून कर्ज घेऊन कार घेऊ शकतो.
पंजाब नॅॅशनल बँके कडून त्यांनी ५००० चे कर्ज घेतले व कार विकत घेतली .पण एक वर्षातच शास्त्रीजी यांचे निधन झाले . यानंतर त्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी कर्ज उर्वरित माफ करण्याविषयी प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला परंतु शास्त्री जी यांच्या पत्नी ललिता शास्त्री यांनी हा प्रस्ताव नाकारला .त्यानंतर पुढील ४ वर्षात आपल्या पेन्शनमधून कारचे संपूर्ण कर्ज त्यांनी फेडले .
आजही ही कार लाल बहादुर शास्त्री मेमोरियलमध्ये ठेवलेली आहे .
#Science&Technology News-????????
????
✅ सुर्ख़ियों में- ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल
????
➡️ हाल ही में ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल का ओडिशा के बालासोर स्थित आईटीआर से सफल परीक्षण किया गया।
➡️ ब्रह्मोस क्रूज मिसाइल में स्वदेशी बूस्टर और एयरफ्रेम सेक्शन के साथ कई अन्य मेड इन इंडिया सब-सिस्टम हैं।
➡️ यह स्वदेशी सामग्री को बढ़ाने में एक बड़ा कदम है।
➡️ यह Mach 2.8 की Speed पर क्रूज़ करती है।
✅ ब्रह्मोस मिसाइल
????
➡️ प्रकार- सुपरसॉनिक क्रूज
➡️ निर्माता- एनपीओ मशीनोस्त्रोयेनिया व रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन
➡️ इंजन- दो चरण वाला
➡️ गति- Mach 2.8
➡️ सटीकता- 1 मीटर
➡️ प्रक्षेपण मंच- युद्धपोत, पन्डुब्बी, लड़ाकू विमान(जाँच प्रक्रिया में) और भूमि स्थित अस्थायी प्रक्षेपक।
रमांक – दिल्ली, गोवा आणि चंदीगड.
• “द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड” या पुस्तकाचे लेखक – एस. जयशंकर (परराष्ट्र मंत्री).
• इतिहासातला पहिला वेगवान गोलंदाज ज्याने 600 कसोटी बळी घेतले – जेम्स अँडरसन (इंग्लंड).
• देशातले पहिले विद्यापीठ ज्याने एका अंतराळ अभिनवता केंद्राची स्थापना करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत सामंजस्य करार केला – वीर सुरेंद्र साई तंत्रज्ञान विद्यापीठ (VSSUT), ओडिशा.
• 1.8 किलोमीटर लांबीची भारतातली सर्वात दीर्घ नदी रोपवे सेवा – आसाममध्ये (गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडते).
• ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2020’ची विजेती, जी भारतीय आणि चीनी अशा दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट पर्वतावर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे – अनिता कुंडू.
• “डिजिटल क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स 2020” या यादीत भारताचा क्रमांक – 57 वा.
• माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाइन देशभक्तीपर लघु चित्रपट’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविणारा लघु चित्रपट – ‘एम आय?’ (अभिजीत पॉल दिग्दर्शित)
• 31 ऑगस्ट पासून अशोक लवासा यांच्या जागी भारताचे नवीन निवडणूक आयुक्त – राजीव कुमार.
• अमेरिकेचा ‘USISPF 2020 लीडरशिप अवॉर्ड’ जिंकणारे – आनंद महिंद्रा आणि शंतनू नारायण.
• केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने ……………या शहरात ‘एकात्मिक प्रादेशिक कार्यालय’ (IRO) स्थापन करण्याचा निर्णय घेतला – विजयवाडा, आंध्रप्रदेश.
• सर्व वृक्षारोपण प्रकल्पाच्या अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची देखरेख करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याचे मोबाईल अॅप – ‘हरित पथ’.
• ‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार 2020’ याचे विजेता – रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन टी. (पॅरा), मणिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश (कुस्ती), राणी (हॉकी).
• जीवन गौरव श्रेणीत ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2020’ याचे विजेता – (मृत) मगन बिसा.
• ‘मौलाना अबुल कलाम आझाद (माका) करंडक 2020’ याचे विजेता – पंजाब विद्यापीठ, चंदीगड.
• …………..या राज्य सरकारने शहरी भागातल्या गरीब व गरजू लोकांना 8 रुपयांत पौष्टिक भोजन देणारी ‘इंदिरा रसोई’ योजना लागू केली – राजस्थान
• 2020 साली ‘दहशतवाद पीडितांना श्रद्धांजली व स्मृतिचा आंतरराष्ट्रीय दिन’ (21 ऑगस्ट) याची संकल्पना – “नॉट फॉरगॉटन: स्टोरीज ऑफ रीमेम्बरन्स ऑफ व्हीक्टिम्स ऑफ टेररीझम”.
• ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये भारतातले सर्वात स्वच्छ शहर – इंदूर, मध्यप्रदेश.
• गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर – वाराणसी.
• भारतातली सर्वात स्वच्छ राजधानी – नवी दिल्ली.
• ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये 100 हून अधिक शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रथम स्थान – छत्तीसगड.
• ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये 100 पेक्षा कमी शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रथम स्थान – झारखंड.
• भारतातली सर्वात स्वच्छ छावणी – जालंधर छावणी मंडळ.
• भारतातले 40 लक्ष लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर – अहमदाबाद, गुजरात.
घडामोडी – 02 ऑक्टोबर 2020
????दिनविशेष
????जागतिक पोस्ट कार्ड दिन – 1 ऑक्टोबर.
????जागतिक शाकाहारी दिवस – 1 ऑक्टोबर.
????आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन – 2 ऑक्टोबर.
????अर्थव्यवस्था
ही सार्वजनिक बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) यांनी कंपनीचे ‘शिखर अॅप’ वापरणार्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पतपुरवठा सुलभ करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली – भारतीय स्टेट बँक (SBI).
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे निश्चित केलेले दुसर्या सहामाहीचे अर्थोपाय आगाऊ रकमा (WMA), जी केंद्र सरकारसाठी अल्पमुदत कर्ज सुविधा आहे – 1.25 लक्ष कोटी (महादम) रुपये.
????आंतरराष्ट्रीय
30 सप्टेंबर रोजी, या देशाने औपचारिकपणे ‘आशिया-प्रशांत व्यापार करार’ (APTA) याला मान्यता दिली – मंगोलिया.
विकसनशील देशांसोबत मंगोलियाचा प्रथम प्रादेशिक व्यापार करार – ‘आशिया-प्रशांत व्यापार करार’ (APTA).
WHO आग्नेय आशिया प्रदेशाच्या समावेशासह जगभरात निरोगी वार्धक्यनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी प्रारंभ झालेला जागतिक आरोग्य संघटनेचा पाठिंबा असलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा उपक्रम – निरोगी वार्धक्यन दशक (2020-2030) (Decade of Healthy Ageing).
30 सप्टेंबर रोजी, भारताने या देशांसोबत एअर बबल व्यवस्था स्थापन केली – केनिया आणि भुटान.
पंजाब सरकारच्या भागीदारीत UNDP याच्यावतीने दिलेला, ‘एकात्मता, अभिसरण, संयुक्त कृती व समग्र उपाय दृष्टिकोन – उद्योग’ श्रेणीमध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघ शाश्वत विकास ध्येये (UNSDG) कृती पुरस्कार’चा विजेता – CII फाउंडेशन.
जगातला पहिला देश ज्याचा स्वतःचा आतिथ्य निष्ठा कार्यक्रम असणार – मालदीव.
????राष्ट्रीय
प्रथम वार्षिक ‘इंडिया हॅपीनेस रिपोर्ट’नुसार, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या ‘सुख-समाधान’ क्रमांकन यादीत अव्वल तीन क्रमांक – मिझोरम, पंजाब, अंदमान व निकोबार बेटे.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या ‘सुख-समाधान’ क्रमांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक – 12 वा.
मोठ्या राज्यांच्या ‘सुख-समाधान’ क्रमांकन यादीत अव्वल तीन क्रमांक – पंजाब, गुजरात आणि तेलंगणा.
छोट्या राज्यांच्या ‘सुख-समाधान’ क्रमांकन यादीत अव्वल तीन क्रमांक – मिझोरम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.
केंद्रशासित प्रदेशांच्या ‘सुख-समाधान’ क्रमांकन यादीत अव्वल तीन क्रमांक -अंदमान व निकोबार बेटे, पुडुचेरी आणि लक्षद्वीप.
‘भविष्य सुख-समाधान’ क्रमांकन यादीत अव्वल तीन क्रमांक – मणीपूर, अंदमान व निकोबार बेटे आणि गुजरात.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याहस्ते “ग्रामीण विकासासाठी __ तंत्रज्ञाने” कार्यक्रमाचे उद्घाटण झाले – वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
‘अनुसूचित जातींसाठी उपक्रम भांडवल निधी’ अंतर्गत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे अभियान – आंबेडकर सामाजिक नवप्रवर्तन व उबवण अभियान.
????व्यक्ती विशेष
कामगार व रोजगार मंत्रालयात नवीन सचिव – अपूर्व चंद्र.
????राज्य विशेष
या राज्य सरकारने 2020 साली दहावीत 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‘अनुनदोरम बोरूह पुरस्कार 2020’ दिला – आसाम.
????ज्ञान-विज्ञान
2025 साली पाठवली जाणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची शुक्र मोहीम – VIRAL (व्हिनस इन्फ्रारेड अॅटमॉसफियरीक गॅसेस लिंकर) इन्स्ट्रुमेंट.
VIRAL इन्स्ट्रुमेंटच्या विकासात भारताचे सह-भागीदार – रशियाची रोसकॉसमॉस अंतराळ संस्था आणि LATMOS प्रयोगशाळा (फ्रान्स).
ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी विकसित केलेले जगातले सर्वात कार्यक्षम ब्लॉकचेन प्रोटोकॉल, जो क्वांटम संगणकांविरूद्ध सुरक्षित आहे आणि त्याच्या वापरकर्त्यांची आणि त्यांच्या व्यवहाराची गोपनीयता संरक्षित करतो – MatRiCT.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
जैविक विविधता विषयी करार – स्वीकारले: 5 जून 1992; प्रभावी: 29 डिसेंबर 1993.
संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिरोध करार (UNCCD) – स्वीकारले: 14 ऑक्टोबर 1994; प्रभावीः 26 डिसेंबर 1996.
वन्य प्राणीजात आणि वनस्पतिजात यांच्या बेकायदेशीर व्यापारासंबंधी निर्देशित सहकारी अंमलबजावणी कार्य विषयी लुसाका करार – स्वीकारले: 8 सप्टेंबर 1994; प्रभावीः 10 डिसेंबर 1996.
आंतरराष्ट्रीय जल प्रवाहाच्या अनौकानयन वापराचा कायदा विषयी करार (जल प्रवाह करार) – स्वीकारले: 21 मे 1997; प्रभावीः 17 ऑगस्ट 2014.
खुली माहिती, निर्णय घेण्यामध्ये लोकसहभाग आणि पर्यावरणी प्रकरणांमध्ये न्याय मिळविण्याची मुभा विषयी करारावर स्वाक्षरी – 25 जून 1998.
गांधी जयंती 2020: गांधी दर्शन से संबंधित 10 मुख्य बातें
विश्व भर में 02 अक्टूबर को अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस मनाया जाता है. यह दिवस महात्मा गांधी के जन्मदिवस के अवसर पर मनाया जाता है. महात्मा गांधी का शिक्षा के क्षेत्र में भी महत्वपूर्ण योगदान रहा है.
पूरा देश 02 अक्टूबर 2020 को राष्ट्रपिता महात्मा गांधी की 151वीं जयंती का जश्न मना रहा है. उन्होंने देश को आजादी दिलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी. ऐसे में राष्ट्रपति रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह और रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने उनके जन्मदिवस पर उन्हें नमन किया है और देशवासियं को उनके सत्य और अहिंसा के पग पर चलने का दोबारा संकल्प लेने को कहा है.
वहीं प्रधानमंत्री ने राजघाट जाकर बापू को श्रद्धा सुमन अर्पित किए। इस दौरान यहां पर जयंती के अवसर पर भजन का भी आयोजन किया गया. महात्मा गांधी की 151वीं जन्म शताब्दी पर देश और दुनिया भर में कई तरह के कार्यक्रम प्रसारित किये जा रहे है. इस दौरान महात्मा गांधी के जीवन से लेकर उनके सामाजिक तथा राजनीतिक जीवन के प्रत्येक छोटे-बड़े किस्से को याद किया जा रहा है.
महात्मा गांधी के भारत की आजादी में बहुत ही महत्वपूर्ण योगदान रहा है. महात्मा गांधी अपने सादा-जीवन तथा उच्च विचारों के चलते प्यार से भारतीयों के बापू बन गये थे. विश्व को महात्मा गांधी ने ही सत्य की शक्ति से परिचय करवाया था. महात्मा गांधी के सत्याग्रह के कारण से ही अंग्रेज भारत छोड़ने पर मजबूर हो गये थे.
विश्व भर में 02 अक्टूबर को अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस मनाया जाता है. यह दिवस महात्मा गांधी के जन्मदिवस के अवसर पर मनाया जाता है. महात्मा गांधी का शिक्षा के क्षेत्र में भी महत्वपूर्ण योगदान रहा है. उन्होंने आजीवन स्वास्थ्य की चिंता की तथा उसके लिए तरह-तरह की चिंताओं का अवलंबन भी किया.
गांधी दर्शन से संबंधित 10 मुख्य बातें
• महात्मा गांधी का जन्म 02 अक्टूबर 1869 में गुजरात के पोरबंदर में हुआ था. उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी है.
• महात्मा गांधी का व्यक्तित्व तथा कृतित्व आदर्शवादी रहा है. उनका आचरण प्रयोजनवादी विचारधारा से मिलता-जुलता था.
• उन्हें संसार के अधिकांश लोग महान राजनीतिज्ञ और समाज सुधारक के रूप में जानते हैं. पर उनका यह मानना था कि सामाजिक उन्नति के लिए शिक्षा का एक अहम योगदान होता है.
• राजवैद्य जीवराम कालिदास ने गांधी को महात्मा के नाम से सबसे पहले साल 1915 में संबोधित किया था.
• महात्मा गांधी ने आजादी के लिए संघर्ष के दौरान करीब 17 बार उपवास रखा और उनका सबसे लंबा उपवास 21 दिन का था.
• सुभाष चंद्र बोस ने महात्मा गांधी को 06 जुलाई 1944 को रेडियो रंगून से ‘राष्ट्रपिता’ कहकर संबोधित किया था.
• महात्मा गांधी कहते थे की अहिंसा मानवता के लिए सबसे बड़ी ताकत हैं. यह आदमी द्वारा तैयार विनाश के ताकतवर हथियार से भी बहुत अधिक शक्तिशाली हैं.
• महात्मा गांधी ने सबसे पहले प्रवासी वकील के रूप में दक्षिण अफ्रीका में भारतीय समुदाय के लोगों के नागरिक अधिकारों हेतु संघर्ष के लिए सत्याग्रह करना शुरू किया था.
• उन्होंने ब्रिटिश सरकार द्वारा भारतीयों पर लगाये गये नमक कर के विरोध में साल 1930 में नमक सत्याग्रह तथा इसके बाद साल 1942 में अंग्रेजो भारत छोड़ो आन्दोलन से खासी प्रसिद्धि प्राप्त की थी.
• उन्होंने सभी परिस्थितियों में अहिंसा तथा सत्य का पालन किया और सभी को इनका पालन करने के लिये वकालत भी करते थे. उन्होंने परम्परागत भारतीय पोशाक धोती और सूत से बनी शाल पहनी जिसे वे स्वयं चरखे पर सूत कातकर हाथ से बनाते थे.