खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील २४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, २० कोरोनामुक्त

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी आलेल्या अहवालात २४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत ९७ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४२०५ वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुन्हा शुक्रवारी दिलासा मिळाला. तर शुक्रवारी आलेल्या अहवालात २४ जणांना कोरोनाची लागन झाल्याने निष्पन्न झाले. त्यात  १८ नवीन रुग्णांचा समावेश आहे. यात अमळनेर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच संपर्कात आलेल्या ६ रुग्णांचा समावेश आहे. तर शुक्रवारी २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३९१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या कोविड रुग्णालयात १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button