खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह ग्रामीण भागात २३ रुग्ण पॉझिटिव्ह, १९ रुग्णांनी केली कोरोनावर मात

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरला. यात २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर गुरुवारी एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तर आतापर्यंत ९६ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४१८१ वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुन्हा गुरुवारी दिलासा मिळाला. तर मंगळवारी आलेल्या अहवालात २३ जणांना कोरोनाची लागन झाल्याने निष्पन्न झाले. त्यात  १८ नवीन रुग्णांचा समावेश आहे. यात अमळनेर शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. तसेच संपर्कात आलेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे. तर गुरुवारी १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३८९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या कोविड रुग्णालयात १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button