अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात शनिवारी आलेल्या अहवालात आणखी ५६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९४ जणांचा बळी गेला आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४०८५ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी आलेल्या अहवालातही ५६ जणांना कोरोनाची लागन झाल्याने निष्पन्न झाले. त्यात ३९ नवीन रुग्णांचा समावेश आहे. यात अमळनेर शहरातील २१ आणि ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच संपर्कात आलेल्या १७ रुग्णांचा समावेश आहे. तर शनिवारी १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३६८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या कोविड रुग्णालयात ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.