कलाली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखांची घरपोच दिली मदत

विभागीय आयुक्तांच्या ‘उभारी’ योजनेंतर्गत कुटुंब सावरण्यासाठी मिळाला आधार

अमळनेर (प्रतिनिधी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तालुक्यातील कलाली येथील  शेतकऱ्याच्या कुटुंबाला विभागीय आयुक्तांच्या ‘उभारी’ योजनेंतर्गत एक लाखाची मदत घरपोच देण्यात आली. यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून कुटुंब सावरण्यासाठी उभारी मिळाली आहे.
अमळनेर तालुक्यातील कलाली येथील निंबा मणीलाल पाटील या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आयुक्तांच्या ‘उभारी’ योजनेंतर्गत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्या शेतकऱ्याच्या वारसदार कुटुंबाला ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये  त्यांच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवण्यासाठी धनादेश कलाली येथे जाऊन देण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्यासोबत तलाठी वाल्मिक पाटील , लिपिक संदीप पाटील हजर होते. तसेच विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचनेनुसार या कुटुंबाबची माहिती घेऊन समाजसेवी संस्थांमार्फत कुटुंबाला काही सुविधा देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे तहसिलदार वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *