जैन सोशल ग्रुप अमळनेरने गोशाळेला ७३३० रुपये निधी देऊन केली मदत

अमळनेर (प्रतिनिधी) गोशाळाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जैन सोशल ग्रुप अमळनेरतर्फे ७३३० रुपये निधी देण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात गौशाळेकड़े दुर्लक्ष होऊ नये म्हणून अमळनेर येथील कांतिलाल ललुभाई झव्हेरी गौशाळेला जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रीजन गो ग्रास कमिटी व जैन सोशल ग्रुप  अमळनेरतर्फे ५००० चा चेक व २३३० रुपये एकूण ७३३० रोख स्वरुपात  देण्यात आले. चेक देताना जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष महावीर सिंघवी, सेक्रेटरी राजेश जैन, पूनम कोचर, दिनेश लोढ़ा व संस्थेचे मैनेजर कीर्ति जैन व कर्मचारी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *