उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर सचिवपदी आर.बी.पाटलांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतपेढीच्या नूतन कार्याकरिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात लोण येथील शिक्षक कैलास उत्तम बागुल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेकाळी नवीन कार्याकरिणी निवडीचा कार्यक्रम पार पडला. यात उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मानद सचिव आर. बी. पाटील, खजिनदार कविता पाटील , संचालक राजेंद्र पवार, सुलोचना पाटील, जे. एस. पाटील, सचिन साळुंखे, तुषार बोरसे, वसुंधरा लांडगे, हेमराज विसावे, रमेश चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणूक कामी व्यवस्थापक लोकनाथ पाटील, लिपिक रवींद्र पाटील, सागर पवार यांचे सहकार्य लाभले. नूतन पदाधिकाऱ्यांचा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ, सचिव डी. डी. राजपूत, तालुका माध्यमिक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, टीडीएफचे अध्यक्ष सुशील भदाणे, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यध्यक्ष आर. जे. पाटील व तालुकाध्यक्ष विशाल वाघ, गणित मंडळाचे डी. ए. धनगर, विज्ञान मंडळाचे निरंजन पेंढारे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, नीलेश विसपुते, संजय बोरसे, विजय बोरसे, महेश माळी आदींनी सत्कार करून गौरव केला.