रस्ता खराब करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड परिसरात असलेल्या केले नगरमधील रस्त्याची अत्यंत वाट लागून त्याचे शिक्रण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना, महिलांना मोठी कसरत कारावी लागते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना नगरपालिकेत बोलावल्याने संतप्त नागरिक आणि महिलांना नगरपालिकेवर अक्रमण करीत आपली समस्या मांडली. रस्ता खराब करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्वरीत रस्त्याची समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
शहरातील ढेकू रोड परिसरात असलेल्या केलेनगर मधील ग नं १७६२ मधील भागात असलेल्या कच्या रस्त्याचे बारा वाजवले आहेत. रहिवाशांनी स्वखर्चाने मुरूम टाकून हा रस्ता चालण्यायोग्य केला होता. मात्र यावर विक्की ललवाणी व कैलास पाटील यांनी मुरुमाची वाहतूक सुरू केली. त्यावेळी रहिवाशांनी त्यांना भेटून रस्त्याचे नुकसान होत असल्याची स्पष्टपणे जाणीव करून दिली. मात्र या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यात सतत पडणाऱ्या पावसाने रस्ता खराब झाला व मोठे मोठे खड्डे पडले. त्यामुळे खड्यात पाणी साचून तळे साचले आहेत. महिला व पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी शौचालयाचे पाणी सोडलेले आहे. त्यामुळे रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी पालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. याबाबत दखल न घेतल्यास नागरिक तीव्र आंदोलन करणार आहेत, असे निवेदन दिले. यावर परिसरातील नागरिक अशोक सोनवणे, सुनील वाल्हे, विजय पाटील, भरत जाधव, ललिता वारुळे, विलास वारुळे, शैला पाटील, शशिकला सोनवणे, मनीषा पाटील, निखिल पाटील, स्वप्नील पाटील, विठ्ठल पाटील, व्ही. एम. शिंदे, संभाजी पाटील, मनोज पाटील, सुमित पाटील, आनंद सोनटक्के, वंदना सोनटक्के, चेतन सोनटक्के, श्रीकृष्ण मुके, सुनिता मुके, सुरेश सोये, प्रमिला सोये, गजानन बावरकर, लक्ष्मी बावरकर, भाऊसाहेब पाटील, वैशाली पाटील, नितीन पाटील, पूनम पाटील, भरत बाविस्कर, अनिता बाविस्कर, भिकन सोनवणे, सपना सोनवणे, शोभा पवार, सर्जेराव पवार, सुभाष ठाकरे, अनिता ठाकरे, रमेश सोनवणे, जयश्री सोनवणे आदींनीही हे निवेदन दिलेले आहे.