स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1. Hemis National Park
– जम्मू आणि काश्मीर
– 4400 KM²

2. Desert National Park
– राजस्थान
– 3162 KM²

3. Gangotri National Park
– उत्तराखंड
– 2390 KM²

4. Mamdapha National Park
– अरूणाचल प्रदेश
– 1985 KM²

5. Khangchendzonga National Park
– सिक्किम
– 1784 KM²

6. Guru Ghasidas (Sanjay) National Park
– छत्तीसगढ
– 1440 KM²

7. Gir Forest National Park
– गुजरात
– 1412 KM²

8. Sundarbans National Park
– पश्चिम बंगाल
– 1330 KM²

9. Jim Corbet National Park
– उत्तराखंड
– 1318 KM²

10. Indravati National Park
– छत्तीसगढ
– 1258 KM²

???? DRDO कडून ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

– संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.

◾️ठिकाण- ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

– या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.

-पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आलं. तसंच ही चाचणी यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात आलं.

◾️अंतर- “३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

– पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत.

– पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.
————————————————-

■◆■ दिनविशेष ■◆■

आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे निर्मूलन दिन – .

◆◆संरक्षण◆◆

23 सप्टेंबर रोजी भारताने ओडिशामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे स्वदेशी विकसित अणुशक्ति-सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राची यशस्वी रात्री-चाचणी घेतली – पृथ्वी-2 (350 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

जागतिक आरोग्य संघटनेनी दिलेले, असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी वर्ष 2020 साठी “यू.एन. इंटरएजन्सी टास्क फोर्स (UNIATF) पुरस्कार”चे विजेता – केरळ राज्य (भारत).

◆◆राष्ट्रीय◆◆

‘फिट इंडिया चळवळी’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 24 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या “फिट इंडिया संवाद” कार्यक्रमादरम्यान ‘वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉल’चा शुभारंभ करण्यात आला आणि ते या मंत्रालयाने जाहीर केले – क्रिडा व युवा कल्याण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय.

नव्या ‘सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स’ (दिव्यांगत्व क्रिडा केंद्र) याचे स्थळ – ग्वाल्हेर, मध्यप्रदेश.

5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ____ आणि नीती आयोग यांच्यावतीने “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020) कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे – इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.

औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या या संस्थेनी आयुष आणि विविध वनौषधी उद्योग संघटनांसोबत एक करार केला – राष्ट्रीय वनौषधी मंडळ (NMPB).

ही व्यक्ती 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या “वैश्विक भारतीय वैज्ञानिक (VAIBHAV / वैभव) शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

__ असणारे डॉ. शेखर बसू यांचे 24 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले – अणूशास्त्र वैज्ञानिक.

भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याच्या जागी, देशातले वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाचे सर्वोच्च नियमन संस्था म्हणून 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्त्वात आलेल्या ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) याचे पहिले अध्यक्ष – डॉ. सुरेश चंद्र शर्मा.

सामाजिक व आर्थिक प्रगती केंद्राचे (CSEP) नवे चेअरमन – विक्रम सिंग मेहता.

सामाजिक व आर्थिक प्रगती केंद्राचे (CSEP) नवे प्रेसिडेंट – राकेश मोहन.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

‘धवन-I’ नामक भारतातले प्रथम खासगीरित्या विकसित केलेले स्वदेशी संपूर्णपणे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन (100 टक्के थ्रीडी प्रिंटेड), जे पूर्णरीत्या लिक्विड नॅचरल गॅस (LNG) आणि लिक्विड ऑक्सिजन (LoX) या इंधनावर कार्य करते, याला तयार करणारी कंपनी – स्कायरुट एरोस्पेस.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

राज्यक्षेत्रीय समुद्र व निकटवर्ती क्षेत्र विषयी अभिसंधि – स्वीकारले: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 10 सप्टेंबर 1964.

मुक्त सागर विषयी अभिसंधि – स्वीकारले: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 30 सप्टेंबर 1962.

मासेमारी व मुक्त सागराच्या सजीव संपदेचे संवर्धन विषयी अभिसंधि – स्वीकारले: 29 एप्रिल 1958; प्रभावीः 20 मार्च 1966.

सागरी कायद्याविषयी संयुक्त राष्ट्रसंघाची अभिसंधि (UNCLOS) – स्वीकारले: 10 डिसेंबर 1982; प्रभावीः 14 नोव्हेंबर 1994.

मध्यस्थीमुळे परिणामी आंतरराष्ट्रीय समझोता कराराविषयी संयुक्त राष्ट्रसंघाची अभिसंधि – स्वीकारले: 20 डिसेंबर 2018; प्रभावीः 12 सप्टेंबर 2020.

चालू घडामोडी (जुलै २०२०):-
————————————————–

• 2020 साली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ची (15 जुलै) संकल्पना…………….. ही होती. – “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ”.

• ……………….हे राज्य ‘पंतप्रधान स्वनिधी’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम ठरले – मध्यप्रदेश.

• ………….ही जगातील सर्वात मोठी वित्तीय सेवा संस्था गांधीनगर (गुजरात) मधील GIFT सिटी येथे IFSC बँकिंग युनिटची स्थापना करणार आहे – HSBC (हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) लिमिटेड.

• युरोपीय संघाच्या युरोपीय परिषदेचे वर्तमान अध्यक्ष……………… हे आहेत – चार्ल्स मिशेल.

• ‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक – तेनझिन गेचे टेथोंग.

• ‘ची लुपो’ माहितीपटासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ याचे विजेता – केजांग डी. थोंगडोक.

• ………..या राज्यात घरपोच आरोग्य सेवा देण्यासाठी ‘धनवंतरी रथ’ वाहन चालविले जात आहेत – गुजरात.

• पहिल्यांदाच …………….या देशाकडे रेलगाडी पाठवून भारतीय रेल्वेनी सीमेच्या पलीकडे भरलेली विशेष पार्सल मालगाडी पाठवली – बांग्लादेश.

• ‘लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे अंतरिम दल (UNIFIL) यासह तैनात असलेल्या ……………या देशाच्या तुकडीने ‘पर्यावरण पुरस्कार 2020’ जिंकला – भारत.

• ……………..या राज्यात भारतातल्या पहिल्या ई-लोक अदालतचे उद्घाटन झाले – छत्तीसगड.

• मोहम्मद मुश्ताक अहमद यांच्या जागी, हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्षम्हणून ………………यांची निवड करण्यात आली – ज्ञानेंद्रो निंगोम्बाम (मणीपूर).

• जगातला……………….. या पहिल्या देशाने ‘फिश क्रायोबँक’ची स्थापना करण्याची घोषणा केली ज्यामुळे मत्स्यउत्पादकांना मूळ मत्स्यप्रजातींच्या शुक्राणूंची उपलब्धता होणार – भारत.

• ‘टेस्ट डबल’ क्रिकेट प्रकारात 4000 धावा काढणारा आणि 150 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू…………….. हा होय – बेन स्टोक्स (इंग्लंड)

▪ *समसंख्या :* ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात.

▪ *विषमसंख्या :* ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी 1,3,5,7,9 हे अंक येतात.

▪ *मूळसंख्या :* ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.

▪ *जोडमूळ संख्या :* ज्या दोन मूळसंख्यात केवळ 2 चा फरक असतो अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.
उदा.: 3-5 , 5-7 , 11-13 , 17-19 , 29-31 , 41-43 , 59-61, 71-73

▪ *नैसर्गिक संख्या :* 1, 2, 3, 4 ……………1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.

▪ *संयुक्त संख्या :* मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
उदा.- 4, 6, 8, 9, 12 इ.

▪ *पूर्ण संख्या :* 0, 1, 2, 3, 4 ………… नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.

प्रश्न मंजुषा ????

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.
ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.
क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

पर्याय-
1 ) अ आणि ब 2) ब आणि क
3 ) अ आणि क 4) ब आणि ड

Ans:-1

2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

पर्याय –
1 ) सप्टेंबर 2 ) डिसेंम्बर
3 ) जून 4 ) मार्च

Ans:-3

3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय –
1 ) अटलांटिक 2 ) पॅसिफिक
3 ) हिंदी 4 ) आर्क्टिक

Ans:-1

4 ) द्वीपगिरी काय आहे ?

पर्याय –
1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .

Ans:-1

5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ……………या वेळेत असतं.

पर्याय –
1 )सकाळी 11 ते 12
2 ) दुपारी 12 ते 1
3 ) दुपारी 1 ते 2
4 ) दुपारी 2 ते 3

Ans:-4

6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?
अ) NOW ऑफ NEVER
ब)BROKEN WINGS
क)THE WAY OUT
ड)NOTA
Ans:-1

7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?
अ)जगन्नाथ मिश्रा
ब)अमीर अली
क)गफार खान
ड)नारायण पंडित
Ans:-1

8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
अ)मिंटो 2रा
ब)कर्झन
क)माउंटबॅटन
ड)वेव्हल
Ans:-3

9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?
अ)तात्या टोपेे
ब)भगतसिँग
क)अनंत कान्हेरे
ड)नोटा

Ans:-1
१०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?
अ)स.सेन
ब)अशोक मेहता
क)T. R. होल्म्स
ड)OTRAM

Ans:-1

● भारताच्या राजधान्या ????

– भारताची राजधानी: दिल्ली

– आर्थिक राजधानी: मुंबई

– व्याघ्र राजधानी: नागपूर

– सांस्कृतिक राजधानी: कोलकाता, चेन्नई

– कोळसा राजधानी: धनबाद

– आइस्क्रीम राजधानी: मंगलोर

– सुवर्ण (Gold) राजधानी: थिरूसार

– खेळ राजधानी: भुवनेश्वर

– बँकिंग राजधानी: चेन्नई

– आरोग्य (Health Care) राजधानी: चेन्नई

– Knit Wear राजधानी: त्रिपुरा

✈️ *आता व्हिसा नसला तरी या १६ देशांत भारतीय नागरिक प्रवास करू शकतात – परराष्ट्र राज्यमंत्री*

*JayBhim Today | International*

???? परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी राज्यसभेत व्हिसा बद्दल माहिती दिली असून भारतीय नागरिकांना काही देशात फिरण्यासाठी व्हिसाची गरज नसल्याचे सांगितले आहे.

● भूतान
● डोमिनिका
● ग्रेनाडा
● हैती
● मालदीव
● हाँगकाँग SAR
● मॉरिशस
● मोंटसेराट
● नेपाळ
● नीयू बेट
● समोआ सेनेगल
● त्रिनिदाद
● टोबॅगो
● सेंट विन्सेंट
● ग्रेनेडाइंस
● सर्बिया

???? *केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार* : *व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा इरान, इंडोनेशिया आणि म्यानमार असे देश देतात. तर श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया त्या ३६ देशांमधील देश आहेत जे ई-व्हिसाची सुविधा देतात.*

????️ *आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावा या दृष्टीने भारतीयांना व्हिसारहित प्रवास, व्हिसा ऑन अराइव्हल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्‍या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी दिली आहे.*

????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *