कोर्टात टाकलेली केस मागे घेतली नाही तर एकाला ठार मारण्याची दिली धमकी

दोघांविरुद्ध धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) कोर्टात टाकलेली केस मागे घेतली नाही तर एकाला ठार मारण्याची धमकी देऊन दोघांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हा आजारी असल्याने उशिराने गुन्हा नोंदवण्यात आला आला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, राजुसिंग परदेशी हे ढेकू रोड वरून जात असताना नरेंद्र जयकृष्ण रामदासी व जयकृष्ण दिगंबर रामदासी (दोघे रा. शनिमंदिर गल्ली अमळनेर) यांनी परदेशी यांचा रस्ता अडवून त्यांना तू टाकलेली केस मागे घेतली नाही तर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास डीवायएसपी सौरभ अग्रवाल करीत आहेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *