अमळनेर येथील पशुवैद्यकीय खाजगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे लसीकरण व टॅगिंग यांच्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांनाही ५० लाखाचे विमा कवच मिळावे, अशी मागणी अमळनेर येथील पशुवैद्यकीय खाजगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी मुंबई येथे दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री यांची भेट घेऊन केली. तसेच त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्याप्रमाणे आम्हीसुद्धा रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सेवा देतो. त्यामुळे आजची परिस्थिती कोरोनाचा संसर्ग प्रत्येक गावात झालेला असल्याने वरील टॅगिंग व लसीकरण काम करताना आमच्या खाजगी लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्हाला म्हणून ५० लाखाचा विमा कवच देण्यात यावे तरच आम्ही काम करू अन्यथा आम्ही काम करणार नाही असे मंत्री महोदय यांना सांगितले. त्यावर त्यांनी सकारात्मक होकार दिला. त्यावेळी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. त्यानंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार रोहित पवार यांची सुद्धा भेट घेतली. तेव्हा पंचायत समिती माजी सभापती डॉ. दिपक पाटील, डाँ. भूषण जोशी, डॉ. गजानन चौधरी, डॉ. सचिन पाटील, डॉ. पंकज चौधरी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री भरणे याचे कक्षाधिकारी डॉ. वडापूरे यांच्याकडे सोपविण्यात आले.