अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर गाडीलोहार समाज मंडळातर्फे ७ फेब्रुवारी रोजी समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम धनजी लोहार होते. हा कार्यक्रम गाडी लोहार समाज मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नंदलाल लोहार शिरूड नाका या ठिकाणी झाला. या वेळी अमळनेर गाडीलोहार समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लोहार यांनी भगवान विश्वकर्मा संदर्भात आपले विचार मांडले. त्याचबरोबर निवृत्त शिक्षक प्रल्हाद लोहार यांनी ही मनोत व्यक्त केले. प्रथमतः देशसेवेसाठी बलिदान देणारे सैनिक बांधव समाजातील सर्व दिवंगत व्यक्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महिला वर्गासाठी समाजाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम राम धनजी लोहार यांनी समाज मंडळाला १० हजार १५१ रुपयांची देणगी घोषित केली. त्याचबरोबर १५ ऑगस्ट २०२० रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व समाज मंडळाचे अध्यक्ष डी. एस. लोहार यांनी स्वीकारला. कार्यक्रमासाठी समाज मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमकांत लोहार यांनी केले.