अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी आलेल्या अहवालात आणखी ४७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९१ जणांचा बळी गेला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ही ३९८३ वर पोहोचली आहे.
अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही ४७ जणांना कोरोनाची लागन झाल्याने निष्पन्न झाले. त्यात २७ नवीन रुग्णांचा समावेश आहे. यात अमळनेर शहरातील १४ आणि ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच संपर्कात आलेल्या २० रुग्णांचा समावेश आहे. तर गुरुवारी १८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 3508 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या कोविड रुग्णालयात ३८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.