राजनंदिनी संस्थेतर्फे भूषण महाले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक भूषण सुरेश महाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भूषण महाले हे शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करत आहेत. मागील वर्षी त्यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेऊन भावी पिढी व्यसनमुक्त घडावी आणि समाज व्यसनापासून दूर रहावा तसेच अमळनेर तालुका तंबाखू मुक्त शाळांचा तालुका होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्षा संदिपा वाघ यांनी पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार वितरण माजी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गौरी उद्योग समूह आणि खान्देश मराठा-कुणबी पाटील समाज वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, शिक्षक संदिप पाटील, ज्ञानेश्वर वाघ, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, कै.कवीवर्य नीळकंठ महाजन स्मृति प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विजय लुल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीही भूषण महाले यांना तीन राज्यस्तरीय तर दोन आंतरराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टतर्फे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांनी कौतुक केले आहे, तसेच सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *