अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहिर करून नुकसान भरपाई द्या

माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसाठी केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे अमळनेर तालुक्यात
अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी अशी मागणी माजी आमदार स्मिताताई वाघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले.
निवेदन देताना माजी आमदार स्मिताताई वाघ आणि हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजयसिंग राजपूत, राहुल पाटील, प्रकाश पाटील,राहुल पाटील, मचिंदर राजपूत, शिवाजी राजपूत,अनिल जैन, राहुल चौधरी, निखिल पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
शेती हा पुर्णतः हवामानावर अवलंबुन असणारा व्यवसाय आहे. शेतकरी आपल्या हाता तोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत असतो. कोरोनाचा संसर्ग, वादळ, खतांची टंचाई , बोगस बियाणे अशा नानाविध संकटांचा सामना करुन आपले शेत फुलवत असतो. त्यातच आता होणारी अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता – तोंडाशी असलेले मुंग , उडीद या पिकांचे तर नुकसान झालेच. त्यात कुठलेही उत्पन्न त्यास मिळाले नाही. परंतु सद्या तालुक्यात होणाऱ्या अवकाळी अतिवृष्टीमुळे कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांवर सुध्दा खुप मोठा परिणाम झाला असून सर्व पिक पुर्णतः वाया गेली आहेत. तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे पिकांवर वेगवेगळया रोगांचा प्रार्दुभाव होवून पुर्ण पिके खराब झालेली आहेत . तरी तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करुन भरीव मदत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास द्यावी अशी मागणी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *