अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे आणि वेळेचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आहे. म्हणून वेळेची मर्यादा न पाळल्याने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या पथकाने १० दुकानांवर कारवाई करून दंड आकारला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी शहरातील सर्व दुकानांना सायंकाळी ६ वाजेची मर्यादा घालून दिली आहे. तर मास्क , सोशल डिस्टन्स , सॅनिटायझर आवश्यक केले असून अनेक दुकानदार नियमाचे पालन करीत नसल्याने २३ रोजी सायंकाळी नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी , हरीश कोळी व नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी शहरात छापा टाकून दिनकर पान सेंटर , माला जनरल स्टोअर्स , महावीर रेडिमेड , कन्हैय्या प्रॉव्हिजन , दुर्गा डेपो , उमेश ट्रेडर्स , भावसार जनरल , गोपाळ किराणा , मलकानी स्टोअर्स , शूज सेंटर या दुकानांवर कारवाई करून मालकांकडून एकूण ४२०० रुपये दंड आकारला आहे.