भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात केले स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या अनोरे गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी सपत्निक शनिवारी गावाला भेट देऊन झालेल्या कामांची केली पहाणी. या वेळी त्यांचे ग्रामस्थ भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला भगिनी व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात स्वागत केले. तर महिलांनी औक्षण तर विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीतातून स्वागत केले.
तसेच यावेळी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली. बी. एन. पाटील यांचा सपत्नीक सत्कार माजी पोलिस पाटील रायचंद दिपचंद पाटील यांनी सपत्नीक केला. तसेच त्यांच्या सोबत असलेले जि. प. कृषी विभागाचे अधिकारी चौधरी यांचा व पाणी फाउंडेशनच्या निलेश राणे, सुनिल पाटील गौरव ठाकरे यांचा सत्कार गावाच्या संस्कुतीनुसार तीन टाळया तीन फुले देऊन केला. सुनील पाटील व निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. तर संपूर्ण गावाची केलेली कामे व पुढील गावांचे नियोजन याची संपुर्ण माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील जवखेङे यांनी प्रास्ताविकात मांडली. तसेच गावासाठी विविध योजनांची मागणी ही केली. तर अध्यक्षीय भाषणात बी. एन. पाटील यांनी आपण केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो. अनोरे हे गाव नसुन एक कुटुंब आहे. गावाचे मनापासून अभिनंदन केले. तर अनोरे गाव हे नेहमी माझ्या स्मरणारत राहील, अशीच एकी ठेवली तर आपल्या गावाचा विकास वेगाने होईल. समृध्द ग्रामसाठी शुभेच्छा देत मी नेहमी आपल्या विकासासोबत आहे. आपण गाव इतक आदर्श बनवा की विदेशातुन लोक आपल्या गावाला भेटी देण्यास येतील. तसेच जिल्हा परिषदच्या सर्व योजना आपण येथे राबवु व एक माॅडेल गावासाठी शुभेच्छा देत मंगरूळ जवखेङे रस्त्या साठी ही निधी उपलब्ध करेल, आश्वासन दिले. ग्रामसेवक शशी पाटील यांनी कार्यकारी मुख्याधिकारी यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार केला.