खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धुळे येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा भाजप युवा मोर्चातर्फे निषेध

तहसीलदारांना निवेदन देऊन अब्दुल सत्तार आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विविध मागण्यांसाठी भेटणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा भाजप युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला असून यासंदर्भात तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीमुळे काही परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्या सत्रांचे परीक्षा शुल्क परत देण्यात यावेत , चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी स्वायत्त विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्क नियंत्रणासाठी नियंत्रण समिती गठीत करण्यात यावी या मागण्यांसह पालकमंत्री अब्दुल सतार यांची भेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत , शहराध्यक्ष योगीराज चव्हाण , समाधान पाटील , सौरभ पाटील , नितीन पवार , सागर बारी , भूषण पाटील , कल्पेश पाटील , जिगर पाटील , भूषण यादव , तर अभाविप चे  दिनेश नाईक ,शहरमंत्री निलेश पाटील , सहमंत्री प्रितेश पाटील, प्रगती काळे ,केशव पाटील, कृष्णा साळुंखे, अभिषेक पाटील , शैलेश पाटील , वैभव पाटील , पवन सैंदाने, विवेक पाटील , कल्पेश पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button