खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पंकज चौधरी यांनी दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने शहराताली दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य पंकज पंडित चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील दिव्यांग कल्याणकारी योजना पाच टक्के निधी ज्या व्यक्तींनी मागणी केली आहे त्यांचा अपंगत्वाचा टक्केवारीनुसार त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा. तसेच युडीआयडी अंतर्गत कायमस्वरूपीचा दाखला बाबत सक्ती करण्यात येऊ नये. मागील वर्षी सन २०१८-१९ मध्ये १३४ लाभार्थींनी युडीआयडी व प्रमाणपत्र देण्यात आला होता. या वर्षी सुमारे दोनशे पाच अपंग बांधवांनी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील सरसकट लाभार्थ्यांचे अपंगत्वाचा उपलब्ध आधार घेऊन तात्काळ लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य पंकज पंडित चौधरी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button