खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

अमळनेरात बनावट दूध व दारू तयार करण्याचा गोरख धंदा करणार्‍या दोघांचा जामीन फेटाळला

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात बनावट दूध व दारू तयार करण्याचा गोरख धंदा करणार्‍या दोघा आरोपींचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळले असून हे दोन्ही आरोपी गेल्या २१ दिवसांपासून अटकेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विजय अमृत पाटील  याला एलसीबी पोलिसांनी ३० जुलै दुपारी मोटरसायकलवर बनावट दारू वाहतूक करताना रंगेहात पकडले होते. विजय अमृत पाटील या यापूर्वी दोनदा बनावट दूध निर्माण करताना सापडला होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याच दिवशी त्याच्या ढेकू रोडवरील निवासस्थानी धाड टाकली. तेंव्हा तेथे बनावट दारू व बनावट दुधाचा कारखाना आढळून आला होता. पोलिसांनी तो उध्वस्त करून तेथील महिलेला देखील अटक केली होती.  त्यादिवसापासून म्हणजे गेल्या २१ दिवसांपासून दोघे आरोपी अटकेत आहेत. विजय अमृत पाटील हा शहराच्या विविध भागात दूध विक्री करत होता. त्यामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
याप्रकरणी आरोपींनी जामीन अर्ज सादर केला होता. त्यावर आज बुधवारी सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला की आरोपी विरुद्ध यापूर्वी असेच गुन्हे दाखल असताना देखील तो बनावट दूध निर्माण करताना सापडला. तर त्याच्याजवळ आढळलेले स्पिरिट मानवी जीवनाला घातक आहे. तपास अपूर्ण असल्याने आरोपीला जामीन देणे योग्य होणार नाही. तर आरोपीतर्फे अॅड. सलीम खान यांनी काम पाहिले. न्या. व्ही. आर. जोशी यांनी दोन्ही आरोपींचा जामीन फेटाळून लावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button