????अर्थशास्त्रावरील प्रश्न सरावासाठी.????
१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?
1) युरो डॉलर
2) एस. डी. आर.
3) पेट्रो डॉलर
4) जी. डी. आर.
उत्तर :- 2✔️✔️
२) खालील विधाने विचारात घ्या.
अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.
ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.
क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 2✔️✔️
३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
1) नाबार्ड
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
3) स्टेट बँक ऑफ इंडिया
4) वरील सर्व
उत्तर :- 1✔️✔️
४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?
1) कच्च्या मालाचा अभाव
2) अपु-या पायाभुत सुविधा
3) आधुनिकीकरण
4) कामगारांची अनुपलब्धता
उत्तर :- 2✔️✔️
५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
अ) शेती उत्पादनाच्या किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे.
ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.
क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.
ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ फक्त
2) अ आणि ब फक्त
3) अ, ब आणि क
4) अ, ब आणि ड
उत्तर :- 3✔️✔️
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
दिनविशेष :- 16/08/2020
◆●◆अर्थव्यवस्था◆●◆
ऑनलाइन गुंतवणूकदार शिक्षण संसाधन केंद्र, जे NSE इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्ट आणि ही संस्था यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे – भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगळुरू.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
शिक्षक प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, पोलीस प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये हे राज्य सरकार अमेरिकेमधील पेनसिल्व्हानिया राष्ट्रकुल सोबत सहकार्य करणार आहे – कर्नाटक.
मॉरिटानिया देशाचे नवीन पंतप्रधान – मोहम्मद औल्द बिलाल.
पहिला पारसी आखाती देश व इजिप्त आणि जॉर्डन यांच्यानंतरचा तिसरा अरब देश ज्याने ‘अब्राहम शांती करारावर स्वाक्षरी केली – संयुक्त अरब अमिराती.
◆◆राष्ट्रीय◆◆
भारत सरकारचा पुढाकार ज्याच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल ‘हेल्थ आय.डी.’ दिले जाणार – राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान.
शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विषयी जनजागृती करण्यासाठी तरुणाईला एकत्र आणण्याच्या उद्देशाने युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने 15 ऑगस्ट रोजी आरंभ केलेला देशव्यापी उपक्रम – फिट इंडिया युथ क्लब.
हे राज्य 12 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या प्रस्तावासह देशातले पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले आहे – ओडिशा.
देशभरातल्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी नॅसकॉम संस्थेच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग यांनी 15 ऑगस्ट रोजी आरंभ केलेला उपक्रम – ‘ATL AI स्टेप अप मॉड्यूल’.
जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी या शहरात ‘बायोफार्मा अॅनालिसिस सेंटर’ (CBA) याचे उद्घाटन केले – पुणे, महाराष्ट्र.
गंगा डॉल्फिनच्या संवर्धनासाठी पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाचा 10 वर्षांचा प्रकल्प – ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’.
◆◆व्यक्ती विशेष◆◆
ऑगस्ट 2020 पासून निर्यात अभिमुख एकक (EOU) आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यांच्यासाठीचे निर्यात विकास परिषद’ (EPCES) याचे नवीन महासंचालक – आलोक वर्धन चतुर्वेदी.
◆◆राज्य विशेष◆◆
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या शहरात भारत मातेच्या 37 फूट उंच कासेच्या पुतळ्याचे अनावरण केले – भोपाळ, मध्यप्रदेश.
या राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी ‘______ आव्हान उद्योजकता कार्यक्रम’चा आरंभ केला – अरुणाचल प्रदेश.
या राज्य सरकारने स्थानिक व्यापार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित केलेला ‘यलो चेन’ नामक एकल खिडकी ई-वाणिज्य मंच कार्यरत केला – नागालँड.
BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) या संस्थेनी भांडवल उभारण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्याच्या हेतूने या राज्य सरकारने स्थापना केलेल्या आयहब नामक इनक्युबेटर केंद्रासोबत करार केला – गुजरात.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
या संस्थेनी 3 किलोमीटरच्या क्षेत्रात उडणारे सूक्ष्म ड्रोन शोधून काढू शकणारी आणि लेजर तंत्राचा वापर करून एक ते अडीच किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातले ड्रोन निष्क्रिय करू शकणारी ‘ड्रोन-रोधी’ प्रणाली विकसित केली आहे – संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO).
◆◆सामान्य ज्ञान◆◆
प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये आढळणारी गोड्या पाण्यातली डॉल्फिन प्रजाती – प्लॅटनिस्टा गंगेटिका गंगेटिका (गंगेटिक रिव्हर डॉल्फिन).
या साली भारतीय पोलीस सेवाने (IPS) भारतीय शाही पोलीसांची जागा घेतली – वर्ष 1948.
गुप्तचर विभाग (IB) – स्थापना: वर्ष 1887; मुख्यालय: नवी दिल्ली.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) – स्थापना: 10 मार्च 1969; मुख्यालय: नवी दिल्ली.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) याची स्थापना – 15 ऑक्टोबर 1984.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (NCRB) याची स्थापना – 11 मार्च 1986.
राष्ट्रीय अन्वेषण विभाग (NIA) याची स्थापना – 31 डिसेंबर 2008.
अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) याची स्थापना – 17 मार्च 1986.
???? ???? गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी ???? ????
(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.
???? प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली.
☘ भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.
पंतप्रधान मोदींचा नवा नारा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’.
????भारताचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
????भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
????करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.
????130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
????देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे.
????आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.
महेंद्र सिंग धोनी चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम
◾️भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा संघनायक महेंद्रसिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यामुळे एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे.
◾️एमएस धोनीने कर्णधार म्हणून
???? 2007 मध्ये टी- 20 विश्वचषक,
???? 2011 मध्ये विश्वचषकात,
???? 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.
???? धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला.
???? 2016 मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला.
◾️गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्या सामन्यानंतर धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची;
◾️ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रीमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले.