खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रक्षाबंधनालाच कोरोनाचे आढळले अर्धशतक रुग्ण

रुग्णांची संख्या ८१९ वर पोहोचली, जानवे शिबिरात आढळले १८ रुग्ण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील रुग्णांचा सोमवारी आलेल्या अहवालात ४८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी अर्धशतकापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने कोरोपासून रक्षण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर तालुक्याची एकूण रुगांची संख्या ८१९  झाली आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख आणि व्हायरल विषाणूजन्य आजारांची साथ पाहता तालुका प्रशासनानाने नागरिकांसाठी मोफत मोहल्ला क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात जानवे येथील शिबिरात घेण्यात आलेल्या ९० स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात १८ आणि कोविड सेंटर मधील पॉझिटिव्ह रुगांच्या संपर्कातील १८ जणही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात अमळगाव ३ , निम १ , मारवड ३ , मंगरूळ १ , केशवनगर १ , विद्याविहार कॉलनी १ , संभाजीनगर १ , पातोंडा १ आदी रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ५४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. २२७ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरात ६ ठिकाणी मोहल्ला क्लिनिकची सुविधा

संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यात यावे म्हणून  शहरात ६ ठिकाणी मोहल्ला क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून नागरिकांना ताप , सर्दी , अंगदुखी , डायरिया आदी लक्षणे आढळून येत असतील त्यांनी मोफत तपासणी करून घ्यावी. ३  ते ८ ऑगस्ट दरम्यान तांबेपुरा, सानेंनगर भागात डॉ. डी. एम. पाटील , पैलाड ताडेपुरा भागात डॉ. एस. एन. भाडीलकर,  आर. के. नगर  भागात डॉ. हेमंत कदम , ढेकू रोड डॉ. नीलेश पाटील, न्यू प्लॉट डॉ. नितीन पाटील , झामी चौक डॉ. हितेश मोरे हे दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान नागरिकांची मोफत तपासणी करणार आहेत. तरी नागरिकांनी विषाणूंजन्य आजारांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button