खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दुधाला प्रतिलिटर १० आणि दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात द्यावे

अमळनेर भाजपाने तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट प्रति लीटर १० रुपये व दुधाच्या भुकटीला प्रति किलो ५० रुपये तातडीने अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर भाजपाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले आहे.
राज्यभरात दूधाच्या भावात मोठी घसरन झाल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शासनाकडून दूध दराच्या बाबतीत कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दुधाला अनुदान जाहीर करण्यात यावे, अशी मागणी अमळनेर भाजपा वतीने करण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील,राहुल पाटील, शहरसरचिटणीस विजय राजपूत, पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे, उपाध्यक्ष संजय पाटील, महेंद्र महाजन, श्रीनिवास मोरे, योगिराज चव्हाण, पंकज भोई, राहुल चौधरी, समाधान पाटील, कल्पेश पाटील, चेतन चौधरी, योगेश जाधव यांचासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button