७ नवीन तर ९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने झाले बाधित
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात पुन्हा १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने असून ७ रुग्ण नवीन तर ९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने सहाशेचा आकडा पार केला आहे.
अमळनेर तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात १६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३५ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्ण ६०३ झाले असून ३६ रुग्ण मृत झाले आहे. तसेच बुधवारी १४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत ४३६ रुग्ण बरे झाले आहेत.
आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे
नवीन आढळून आलेल्या ७ रुग्णांमध्ये लोंढवे १,देवळी १, बोहरा १, जाणवे २, डांगरी १, दहिवळद १ तर संपर्कात आलेल्या ९ रुग्णांमध्ये ब्रहमे गल्ली १, मुंबई गल्ली ५, जाणवे २, देवळी १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.