अमळनेर (प्रतिनिधी) शहरात काल १९ रोजी पुन्हा अजून ११ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून १२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यात ७ रुग्ण नवीन असून यात जानवे १,देशमुख वाडा १,रेऊ नगर १,पाठक गल्ली १,लोण १ व तांबेपुरा २ आदींचा समावेश आहे,तर चार रुग्ण जुन्या संपर्कातील असून यात प्रताप नगर १,देशमुख नगर ३ आदींचा समावेश आहे.आतापर्यंत ४२१ कोरोनामुक्त झाले असून ३३ जण मयत झाले आहेत ९७ जण अमळनेर , चोपडा आणि जळगाव येथे उपचार घेत आहेत.तर शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह, रुगणांची संख्या ५५६ वर पोहोचली आहे