अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शाळांचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात कळमसरे येथील एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.७८ टक्के, मारवड येथील कै. भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९८.८८ टक्के, तर श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.९८ टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांनी मोबाइल, लॅपटॉपवर ऑनलाइन निकाल पाहून जल्लोष केला. त्यात कळमसरे येथील एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयात राज संजय पाटील या विद्यार्थ्यांने ७५.०७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर किरण सुकलाल माळी याने ७४.६१ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. प्राजक्ता प्रदीप निकम या विद्यार्थिनीने ७४.४६ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तर मारवड येथील कै भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये मोनदीप भीकानराव सोनवणे व शुभम नामदेव राठोड या दोघांनी ७४.६१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक विनय पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर दिव्या विश्वास मोरे हिने ७३.३८ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयातून किरण गणेश साळुंखे हिने ७५.३८ गुण मिळवून प्रथम क्रमांक तर रोहित ताराचंद वाडिले याने ७४.३० गुण मिळवून द्वितीय व सानिया कालू खाटीक हिने ७३.३८ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे , सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक ,प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.