खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील ४८ गावांची पीक कापणी प्रयोगासाठी निवड, २२ रोजी प्रशिक्षण होणार

अमळनेर (प्रतिनिधी)जिल्हा कृषी कार्यालयातर्फे तालुक्यातील ४८ गावांची पीक कापणी प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
पीक आणेवारी , पीक विमा आदींसाठी पीक कापणी प्रयोगाचा अहवाल महत्वाचा असून अनेकदा हे प्रयोग परस्पर झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळ व पीक विमा साठी अडचणी आल्या होत्या व आर्थिक लाभापासून वंचित झाले होते या प्रयोगावरूनच उंबरठा उत्पन्न ठरत असते  त्यामुळे यावर्षी त्याचे प्रशिक्षण  अमळनेर येथे होत आहे म्हणून संबंधित गावच्या सरपंच, पोलीस पाटील, तलाठी , ग्रामसेवक यांनी प्रशिक्षणास हजेरी लावून प्रत्यक्ष कापणी प्रयोगाच्या वेळी देखील हजर राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२० च्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड करण्यात आलेली गावे

       खरीप हंगाम २०२० च्या पीक कापणी प्रयोगासाठी तालुक्यातील ४८ गावांची निवड करण्यात आली आहे त्यात धुरखेडा, पिळोदे, खेडी सिम , हिंगोणें  बुद्रुक, जळोद, पिंगळवाडे, हिंगोणें सिम, खापरखेडा प्र ज, अंतुर्ली, गलवाडे खुर्द, तासखेडा, सडावन बु , अंचलवाडी, इंदापिंप्री, कंडारी खुर्द, ब्राम्हणे, कुर्हे बु, नगाव खुर्द , पातोंडा , खापरखेडे प्र डां , दापोरी बुद्रुक , निमझरी , रुंधाटी, भरवस, गोवर्धन, शहापूर , कळमसरे , प्र डांगरी, एकतास, पाडळसरे, कळम्बे, झाडी, चौबारी, जैतपिर , ढेकू चारम, आर्डी, लोण चारम,धार, मालपूर, आनोरे, गलवाडे बु, खोकरपाट, निसर्डी, रनाईचे बु, म्हसले, कचरे, कुर्हे सिम, वाघोदा आदी गावची निवड करण्यात आली आहे.

जी. एस. हायस्कूलमध्ये २२ रोजी प्रशिक्षण

ग्रामस्तरीय पर्यवेक्षण समिती, कृषी पर्यवेक्षक, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाययक, सरपंच, पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण २२ रोजी जी. एस. हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे

गावांची व शेतकऱ्यांची यादी यादृच्छीक पद्धतीने वरिष्ठ पातळीवर  काढण्यात येते

पीक कापणी प्रयोगासाठी गावांची यादी व शेतकऱ्यांची यादी यादृच्छीक पद्धतीने वरिष्ठ पातळीवर  काढण्यात येते. त्यानुसार समिती सदस्यांना बोलावले जाते —
भारत वारे , तालुका कृषी अधिकारी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button