खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह संख्या झाली ४५९, अजून आढळले सहा रुग्ण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात  पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे. यापैकी ३०६ बरे झाले असून ३० मृत झाले आहेत तर ११६ रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील अजून ४९ नवीन स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. धुळे येथे अमळनेरच्या एक ५८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजते.

पॉझिटिव्ह आढळून आलेले रुग्ण असे

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये जुन्या संपर्कातील एक रुग्ण फरशी रोड तर पाच नवीन मध्ये १ गांधली,१ रामेश्वर,हेडावे १,मुडी १, आणि पिंपळे रोड १ आदी रुग्णांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button