खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप मिल कंपाऊंडमध्ये अवैध नळ जोडणाऱ्या नगरपालिकेचा शिपाई निलंबित

कोविड सेंटरला नेमणूक केलेले असतानाही अवैध नळ जोडणीचे करत होता “प्रताप”

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप मिल कंपाऊंडमध्ये अवैध नळ कनेक्शन जोडणाऱ्या नगरपालिकेच्या शिपायाला मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी निलंबित केले आहे. त्याची कोविड सेंटरला नेमणूक केलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून अवैध नळ जोडणीचे प्रताप करीत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष हरी सोनवणे या नगरपालिकेच्या शिपायास कोविड सेंटरला वॉचमन म्हणून नेमणूक केलेली असताना त्याने कार्यालयीन परवानगी न घेता पावती न फाडता  प्रताप मिलमध्ये अवैध नळ कनेक्शन जोडताना आढळून आला. याबाबत नगरसेवक मनोज पाटील व नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर जोडरी विजय विसावे यांनी तपासणी करून अहवाल सादर केलं होता.  मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी बेजबाबदार पणाने वागल्यामुळे करणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र सुभाष सोनवणे यांनी दिलेला खुलासा चुकीचा असल्याने मुख्याधिकारी गायकवाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम  महाराष्ट्र कर्मचारी शिस्त व अपील अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तरतुदीनुसार सुभाष सोनवणे यास निलंबित करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वतःहून बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करून ते फी भरून नियमित करून घ्यावेत दरम्यान, अवैध नळ कनेक्शन घेणाऱ्या नागरिकांवर व देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी दिला असून नागरिकांनी स्वतःहून बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करून घ्यावेत व फी भरून नियमित करून घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button