खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

गौणखनिज चोरी करताना तलाठ्यांच्या पथकावर हल्ला करणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथून घेतले ताब्यात, न्यायालयाने तीन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी) गौणखनिज चोरी प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यांच्या पथकावर तालुक्यातील शिरूड येथे हल्ला करून फरार झालेल्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपींना पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यासंदर्भात अमळनेर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०७,३५३,३३२ व ३७९ प्रमाणे  मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनू पारधी व जेसीपी वाहन चालक श्याम राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होता,घटनेनंतर हे आरोपी फरार होते,यानंतर घटनेच्या निषेधार्थ अमळनेर व चोपडा तलाठी यांच्या संघटनेने लेखणी बंद पुकारले होते. त्या अनुषंगाने तात्काळ दखल म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनवणे यांची माहिती तांत्रिक स्वरूपाची तसेच गोपनीय बातमीनुसार आरोपी याच्या लोकेशन वरून पकडण्यासाठी पाठवून पारोळा हद्दीतील बहादरपुर गावाजवळ सकाळी 3 वाजता त्यास ताब्यात घेतले,काल दुपारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button