खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कोरोनामुळे मोजकेच पदाधिकाऱ्यांनी समांतर अंतर ठेवून शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन साजरा

शहरातील सुभाष चौकात भगवा झेंडा फडकवून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांचा निनाद

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सुभाष चौकात भगवा झेंडा फडकवून शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. कोरोनामुळे मोजकेच पदाधिकाऱ्यांनी समांतर अंतर ठेवून व तोंडाला मास्क लावून जय भवानी जय शिवाजीच्या निनाद केला.
सुरुवातीला तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील व माजी नगरसेवक राजू फापोरेकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पमाल्यार्पण करून भगवा झेंडा फडकवला.  सर्वांनी त्यास नतमस्तक होऊन नमन केले. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे सर्व सामान्यां साठीच्या योजना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार गावागावांत तळागाळातील सामान्य जनांपर्यंत पोहचवण्याचे कार्य सर्वांनी करावे असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख,उपशहरप्रमुख जीवन पवार,मोहन भोई,शहर संघटक चंद्रशेखर भावसार,शिव वाहतूक सेना नाना जोगी, शाखाप्रमुख विजय नवल पाटील,आठवले, पाटील उर्फ आबा चहावाला,चेतन पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.  शहर संघटक चंद्रशेखर भावसार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button