शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून सेवानिवृत्त प्रशासन अधिकार्यांना दिला निरोप
अमळनेर (प्रतिनिधी) भुसावळ न प शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी. टी. ठाकूर यांना अमळनेर येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून निवृत्त प्रशासन अधिकारी रामोळे यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन बी.पी.रामोळे हे दि 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. यामुळे नाशिक येथील शिक्षण उपसंचालकानी या पदावर भुसावळ न प शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी. टी. ठाकूर यांना अतिरिक्त पदभार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी येऊन आपला पदभार स्वीकारला. ठाकूर यांच्याकडे जळगाव व सावदा शिक्षण मंडळाचाही अतिरिक्त पदभार असून ते मूळ दोंडाईचा येथील रहिवासी आहेत.पदभार घेण्याच्या दिवशी त्यांचे शिक्षण मंडळाचे सभापती नितीन निळे व उपसभापती चेतन राजपूत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर निवृत्त झालेले प्रशासन अधिकारी रामोळे यांचाही सत्कार करून निरोप देण्यात आला.
ठाकूर यांनी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली शिक्षण मंडळाची महिती
ठाकूर यांनी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिक्षण मंडळाची महिती जाणून घेतली. यावेळी निवृत्त प्रशासन अधिकारी संतोष सोनू शेटे,कार्यालयीन अधीक्षक सुनिल साहेबराव पाटील,उपशिक्षक रवींद्र पाटील,व कर्मचारी उपस्थित होते.