अमळनेर (प्रतिनिधी) विजेची तार तुटून बैल मृत्युमुखी पडल्याची घटना तालुक्यातील एकतास येथे आज रात्री १२ सव्वा बाराचा सुमारास घडली. एन खरीप हंगामात बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून पेरणी अणि मशागतीची कामेही खोळंबली आहेत.
अमळनेर तालुक्यातील एकतास येथील शेतकरी गुलाब निंबा पाटील या शेतकऱ्याचा बैल विजेच्या तार खंडित झाल्याने मृत्यूमुखी पडला. यामुळे त्यांच्या शेतातील सर्व कामे अर्धावट राहिली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून सकाळी बैलचे पंचनामे करण्यात आले. महावितरण अधिकारी गावंडे, वायरमन वाघ व तलाठी गौरव आप्पा व पशु वैद्यकीय डॉ. योगेश देशमुख यांनी पंचनामे केले. यावेळी सरपंच साहेबराव पाटील, पोलीस पाटील बापुराव मोरे उपस्थित होते.