तलाठी व मंडळाधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक न झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

अमळनेर तालुका तलाठी संघाने घटनेचा निषेध करून प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी)तलाठी व मंडळाधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध केला आहे. तसेच यातील आरोपीना अटक न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कामे वगळता लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांना  निवेदन देण्यात आले आहे.
प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी १६ रोजी दुपारी अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील शाळेच्या मागील गावतालावरून होणारी अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी, मंडलधिकारी यांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवून सोनू  पारधी याने जीवे मारण्याचा प्रयत्न करून वाहनाचे नुकसान केले आहे. या घटनेचा तलाठी संघटनेने निषेध करून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच यापूर्वीही हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासकीय वाहन मिळावे आणि पोलीस बंदोबस्त मिळावा. तसेच लेखी आदेश द्यावेत. तसेच गौण खनिज कार्यवाहीसाठी दिलेल्या नियमांप्रमाणे सुविधा मिळाव्यात, अशी मागणी प्रांताधिकरी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ याना दिलेल्या निवेदनाद्वारे करुन आरोपीस अटक न झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनावर यांच्या आहेत सह्या

निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश महाजन , जिल्हा उपाध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष वाल्मिक पाटील  , चिटणीस मुकेश देसले,  एस. बी. बोरसे , आर. टी. दाभाडे , पराग पाटील , स्वप्नील कुलकर्णी , जितेंद्र जोगी ,डी. एस. देशमुख , वाय. आर. पाटील , एस. जी. पंचभाई , जितेंद्र पाटील , के. एस. चौधरी , प्रदीप कडाळे , जि. जी. पाटील , महेंद्र पाटील , एम. पी. भावसार, प्रकाश महाजन यांच्या सह्या आहेत

कोतवाल संघटनेचा पाठिंबा 

    दरम्यान, तलाठीबाबतच्या घटनेचा कोतवाल संघटनेने देखील तीव्र शब्दात निषेध केला असून त्यांनीही आंदोलनात सहभागी होण्याचे निवेदन दिले आहे. निवेदनावर भिकन गायकवाड , रमेश वंजारी , भटू पाटील , भागवत पुंडलिक , सुभाष मोरे , मुकेश शिसोडे , दत्तात्रय बोरसे , सागर पाटील , समाधान पांचाळ , शत्रूघन बागुल यांच्या सह्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *