????प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान????
????दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.
????परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.
????सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.
????प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.
????परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.
????मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.
????सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.
????प्रार्थना समाजाचे कार्य????
????प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.
????न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.
????ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
????देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.
????अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.
????प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.
????मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.
????४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.
????मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.
????इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.
????इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.
????प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.
????प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन????
????प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.
भारताचे लष्करप्रमुख नेपाळच्या लष्कराचे मानद ‘जनरल’ असतात.
२. भारतीय लष्करात आजही ३८ गोरखा बटालियन्स आहेत.
३. भारत- नेपाळ यांच्यातील १९५० मधील करारानुसार दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या देशांत जाण्यासाठी ‘व्हिसा’ लागत नाही.
> कोविड-19 महामारीच्या काळात उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहक यांच्यासाठी आरोग्यसेवा पुरवठा साखळीचे नवे संकेतस्थळ
– आरोग्यपाथ.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातले पहिले राज्य
– ओडिशा.
गाडीत बसताना प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुणे येथे रेल्वे संरक्षण दल यांनी ठेवण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रोबोट
– ‘कॅप्टन अर्जुन’ (Always be Responsible and Just Use to be Nice).
या राज्य सरकारने कोविड-19 विषाणूच्या समुदायीक प्रसाराचा तपास घेण्यासाठी ‘घर घर निगरानी’ मोबाईल अॅप तयार केले
– पंजाब.
आजपर्यंत चे केंद्रीय वित्त आयोग अध्यक्ष व स्थापना वर्ष
पहिला आयोग 1951 के सी नियोगी
दुसरा आयोग 1956 के सथांनम
तिसरा आयोग 1960 ए के चंदा
चौथा आयोग 1964 डॉ पी व्ही राजमन्नार
पाचवा आयोग 1968 महावीर त्यागी
सहावा आयोग 1972 के ब्रम्हांनद रेड्डी
सातवा आयोग 11977 जे एम शैलाट
आठवा आयोग 1983 वाय व्ही चव्हाण
नववा आयोग 1987 एन के पी साळवे
दहावा आयोग 1992 के सी पंत
अकरावा आयोग 1998 ए एम खुसरो
बारावा आयोग 2002 डॉ सी रंगराजन
तेरावा आयोग 2007 डॉ विजय केळकर
चौदावा आयोग 2013 डॉ वाय व्ही रेड्डी
पंधरावा आयोग 2017 एन के सिंग
???? महात्मा फुले यांचे वाङ्मयीन साहित्य ????
????तृतीय रत्न
????छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा
????विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी
????ब्राम्हणाचे कसब
????गुलामगिरी
????सत्यशोधक समाज हकीकत व निंबध
????इशारा
????अस्पृशांची कैफियत
????सार्वजनिक सत्यधर्म