प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अमळनेर सराफ बाजाराची झळाळी काळवंडली

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कारागीर व रोजंदारी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ८७ दिवसापासून अमळनेर सराफ बाजाराची झळाळी काळवंडली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कारागीर व रोजंदारी कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमळनेर येथील प्रशासन व नेते मंडळी पुर्ण पणे डोळे झाकुन दुर्लक्ष करीत आहेत. विनाकारण व्यापारी बांधवास व त्यावर अवलंबुन असलेले कारागीर व रोजंदारी कामगार यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आजमीतीस वसुंधरा साडीसेंटर तर दगडी दरवाज्यात एक ही रुग्ण अद्याप पावेतो नाही. प्रशासनाची सर्व बंधने व अटींच्या चौकटीत नियम पाळण्याचे आम्ही आश्वासन देत आहोत. मुंबई धारावी येथील सुध्दा व्यवहार सुरु होऊ शकतात. मग येथील का नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *