सर्व आरोप फेटाळून गांधलीपुरा दवाखान्यातील आरोग्य सेविकेने न्यायासाठी प्रांताना दिले निवेदन
अमळनेर(प्रतिनिधी) येथील आशा वर्कर साधना पाटील या त्रयस्तांच्या मार्फत दोन दिवसापासून खोट्या बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव आणत आहे. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याना खोटी माहिती देऊन माझे बदनामीकारक वृत्त प्रसिध्द करीत आहे,व माझ्यावर मानसिक दबाव आणून छळ करीत आहे. त्यामुळे मला न्याय द्यावा, असे आवाहन. गांधलीपुरा दवाखान्यातील एएनएम प्रतिभा साहेबराव पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
अनेक तक्रार अर्जाचा संदर्भ देत प्रतिभा पाटील यांनी आशा वर्कर साधना पाटील यांनी दि. १३ जून रोजी दिलेल्या निवेदनातील आरोप खोटे असल्याचा खुलासा करत निवेदनात म्हटले आहे की, आपण वरील दवाखान्यात गेल्या पाच वर्षापासून प्रामाणीकपणे कार्यरत आहे. तक्रारदार आशा वर्कर साधना अरविंद पाटील ही नोव्हेंबर २०१७ पासून माझ्या सोबत कार्यरत असून जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८ आणि त्यांनतर एप्रिल २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या दरम्यान आशा वर्कर माझ्यासोबत कोणत्याही ठिकाणी कामाला तिची गैरहजेरी असल्यामुळे आणि माझी सही न घेता या दरम्यानचे मानधन तिला अदा करण्यात आलेले आहे. याची खात्री संबंधीत कार्यालय प्रमुखांकडून आपण करुन घ्यावी. तरी देखील माझ्या संदर्भात माझी बदनामी व आरोप करणारे निवेदन व वृत्तपत्रात देऊन साधना पाटील हिने माझा मानसिक छळ केला आहे. हिचे कोणतेही मानधन माझ्या सहीशिवाय अडकल्याचे सदर आशा वर्करने कधीही व कोणीही कळवीले नाही.माझा मूल्यमापन अहवाल आजही प्रलंबित असून कोविड १९ साथीत माझ्या जवाबदाऱ्या मी प्रामाणिक पार पाडलेल्या आहेत,सदर आशा वर्करने न केलेली तातडीची कामेही मी पूर्ण करीत आहे. त्यामुळे मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती अमळनेर नगराध्यक्षा,मुख्याधिकारी, तहसीलदार यासह जिल्हा वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.