माजी खासदार हरिभाऊ जावळेच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याची झाली अपरिमित हानी

आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केल्या भावना

अमळनेर (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष, रावेर मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाल्याने जिल्ह्याची अपरिमित अशी हानी झाले आहे. जिल्ह्यातील शांत संयमी आणि अभ्यासू नेता गमावल्याची भावना आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केली.
हरिभाऊ जावळे  हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी ऑनलाइन अंत्यदर्शन करावे लागले. त्यांच्या निधनामुळे जळगाव जिल्ह्य़ातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर सलग दोनवेळा ते रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2014ला पुन्हा त्यांनी रावेर मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केल्याने त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली कृषी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती.

हरिभाऊ जावळे यांच्या निधनाच्या बातमीमुळे अत्यंत दु:खद : माजी आमदार स्मिताताई वाघ

हरिभाऊ जावळे यांच्या निधनाच्या बातमीमुळे अत्यंत दु:खद आहे. राजकिय क्षेत्रात वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले.
शेती,पाणी, सिंचन याबद्दल आत्मियता असलेला एक कर्तबगार नेता भाजपाने गमावला आहे.  त्यांची जाण्याने न भरून निघणारी पोकळ निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. हरिभाऊ यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

भाऊंच्या अचानकपणे जाण्यामुळे जिल्ह्यावर पसरली शोककळा : आमदार अनिल पाटील

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, जळगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार, माजी आमदार, उत्तम प्रशासक म्हणुन जनतेची सेवा करणारे शांत, संयमी, मितभाषी व मोठा जनसंपर्क असलेले स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जाण्याने जळगाव जिल्हा भाजपा व सर्व पक्षीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. केळी उत्पादक शेतकर्‍यांचा आवाज सभागृहात मांडणारे अष्टपैलु नेते म्हणून स्व.हरिभाऊंची ओळख होती. आज भाऊंच्या अचानकपणे जाण्यामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे, भाऊंच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *