फापोरे ४९ वर्षीय महिला, कावपिंप्री येथील ६७ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात मंगळवारी पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांच्या या सिक्सरने तालुक्यातील रुग्ण संख्या ही द्विशतकपार करीत २३६ वर पोहोचली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे.
अमळनेर तालुक्यातील १२ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले असून त्यात अजून सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंधी कॉलनी मधील ४९ वर्षीय पुरुष, पैलाड येथील ४४ वर्षीय पुरुष ,फापोरे ४९ वर्षीय महिला, कावपिंप्री येथील ६७ वर्षीय पुरुष , 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १५ रोजी घेतलेले ३८ अहवाल व १६ रोजी घेतलेले असे एकूण ७६ अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अजूनही धोका टाळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घरी थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.